आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आनंदनगरला पोलिस ठाण्याचा ताप; वाहने अडवतात रस्ता, जप्त केलेली वाहने उद्यानात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुठल्याही समस्या, त्रास व अन्य कटकटींपासून सुटका मिळवण्यासाठी लोक पोलिस ठाणे गाठतात; पण टाऊन हॉल परिसरात असलेल्या आनंदनगर या वसाहतीला मात्र तेथे असलेल्या पोलिस ठाण्याचा आधार वाटण्याऐवजी ती एक डोकेदुखी वाटत आहे. भर वसाहतीत हे ठाणे आहे. तेथे येणार्‍या वाहनांमुळे रस्ता अडतो. शिवाय जप्त केलेली वाहने ठेवायला जागाच नसल्याने ती वसाहतीतील बागेत ठेवली जातात. त्यामुळे येथील रहिवासी अक्षरश: कंटाळले आहेत. गेल्या दहा वर्षांपासून येथील रहिवाशांचा या पोलिस ठाण्याविरुद्ध लढा सुरू आहे. तर पर्यायी जागा मिळाल्यावर हे प्रश्न सुटतील असे या पोलिस अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.
आनंदनगर हाउसिंग सोसायटीमध्येच बेगमपुरा पोलिस ठाणे आहे. ही छोटी वसाहत आहे. या ठाण्यात आरोपी व त्यांच्याबरोबर येणार्‍या अनेक लोकांचा सतत वावर असतो. त्यामुळे या ठिकाणी कायम गर्दी होते. त्यामुळे तर कित्येक वेळा रहिवाशांना कॉलनीबाहेर पडणेही कठीण होते.
जप्त केलेल्या वाहनांची गर्दी
पोलिसांनी जप्त केलेली वाहनेही या ठिकाणी असलेल्या एका छोट्याशा उद्यानात वर्षानुवर्षे पडलेली असतात. त्यामुळे हे उद्यान बकाल झाले आहे. उद्यान असून अडचण नसून खोळंबा असल्यासारखेच झाले आहे.
सुरक्षा भिंतीलाही भगदाड
सोसायटीच्या सुरक्षा भिंतीलाही भगदाड पडले आहे. त्यामुळे आणखी पंचाईत होते. त्यातच सोसायटीतील उद्यानातही गाजर गवत फोफावले असून जॉगिंग पार्कर्ही रानटी झुडपात अडकलेला आहे. शिवाय कॉलनीतील रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत.
काय म्हणतात जबाबदार
उद्यान विकसित करू
महानगरपालिकेने ती जागा सोसायटीकडून उद्यानासाठीच घेतली आहे. मात्र तिला विकसित केले गेले नाही. उद्यान अधीक्षक विजय पाटील यांच्यासह पाहणी करून उद्यान विकसित करण्याबाबत पाठपुरावा केला जाईल.
अंकुश लाड, वॉर्ड अधिकारी, मनपा
ते तर वाहतूक बेट
>संबंधित जागा पालिका उद्यानाची नाही. हे वाहतूक बेट असल्याने त्याला उद्यान म्हणता येणार नाही. वॉर्ड अधिकार्‍यांनीही मदत करायला हवी.
-विजय पाटील, उद्यान अधीक्षक, मनपा
काय म्हणतात रहिवासी
>पोलिस ठाण्याचा त्रास तर आहेच, शिवाय आमच्या दारापुढे फिर्यादींची वाहने उभी असतात. त्यामुळे खूप त्रास होतो.
-शीला पटेल
>वाहने रस्ता अडवतात. त्यामुळे येथून वाट काढणेही कठीण होऊन बसते. आधीच रस्ता छोटा, त्यात वाहनांचा त्रास होतो.
-डॉ.बी.व्ही. मुळे
>ठाण्यात आरोपींसह त्यांच्या नातेवाइकांचा गराडा असतो. त्यामुळे बाहेर पडता येत नाही.
-उज्ज्वला पाथ्रीकर
>पोलिस ठाणे हलवण्यासाठी तत्कालीन पोलिस आयुक्त रामराव वाघ यांना भेटलो होतो. पण काही फरक पडला नाही.
- प्रा. डॉ. यु. म. पठाण