आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद पोलिसांकडून मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी चक्क बॅनर; नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते बॅनर लावून शहरे विद्रुप करतात. याशिवाय वाढदिवस किंवा अन्य कार्यक्रमाचे होर्डिंग्जही लावतात. पण औरंगाबादमध्ये चक्क पोलिस प्रशासनाकडूनच मुख्यमंत्र्याच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. 
 
बॅनर लावून शहरे विद्रुप करु नका असे कोर्टाने सांगितले असतानाच हा प्रकार घडला आहे. अशी बॅनरबाजी थांबवणे हे खरे तर पोलिसांचे, महापालिकेचं काम आहे. पण औरंगाबाद याउलट घडत आहे. औरंगाबादचे पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे हे बॅनर लावले आहेत.
 
औरंगाबाद पोलिस आपले सहर्ष स्वागत करीत आहे, असे होर्डिंगही लावण्यात आले आहे. यावर औरंगाबाद शहर पोलिसांचे नाविन्यपूर्ण उपक्रम छापण्यात आले आहेत. तसेच बाजूला मुख्यमंत्र्यांसोबत पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांचा फोटो आहे. शहरात आपण काय-काय केले आहे, हे दाखवण्याचाच प्रयत्न यशस्वी यादव यांनी या बॅनरमार्फत केला असल्याचे म्हटले जात आहे. 
बातम्या आणखी आहेत...