आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तेत नसताना सर्वांना कळवत, आता मंत्री आले तरी निरोप नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पंधरा वर्षांच्या वनवासानंतर सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते दिवसेंदिवस आणखी नाराज होत चालल्याचे चित्र आहे. सत्तेचा लाभ तर मिळत नाहीच, उलट मंत्र्यांना भेटता येऊ नये याची खबरदारी घेतली जात असल्याची तक्रार आहे. पूर्वी सत्ता नसताना एखादा नेता शहरात येणार असेल तर ‘मेसेज’ सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांना पाठवले जायचे. परंतु आता मंत्री शहरात येणार असल्याचा निरोप दिला जात नाही. मंत्र्यांपासून दूर ठेवण्याचा हा प्रकार असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे.

१७ सप्टेंबरला माजी मंत्री एकनाथ खडसे शहरात आले. याची माहिती कोणालाही देण्यात आली नव्हती. त्यामुळे कालपर्यंत सत्तेच्या गर्दीत वावरणारे खडसे सुभेदारी विश्रामगृहावर दोन तास एकटेच बसून होते. राजीनामा द्यावा लागला म्हणून काय झाले? ते शहरात येणार असल्याचे कळवले असते तर नक्कीच भेटायला गेलो असतो, असे एका कार्यकर्त्याने स्थानिक नेत्यांना सांगितले. गुरुवारी गिरीश महाजन शहरात होते. काही जाहीर कार्यक्रम तसेच वृत्तपत्रांत जाहिराती असल्याने कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी गेले आणि तेथे गर्दीही दिसली. परंतु त्याच्या दुसऱ्याच दिवशी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार शहरात होते. त्यांचा शासकीय कार्यक्रम होता याचीही माहिती आजी-माजी पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेली नव्हती.
ठरावीकमंत्री अन् त्यांच्यासमवेत ठरावीक कार्यकर्ते : भाजपच्याकोणत्या मंत्र्यांसोबत स्थानिक कोणता पदाधिकारी असेल हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. एखाद्या मंत्र्याला भेटायचे असेल तर त्या कार्यकर्त्यामार्फतच जावे लागते. त्यामुळे ‘आपला’ मंत्री येणार आहे याची माहिती त्यांच्या ठरावीक कार्यकर्त्यांनाच असते.

मंत्री येऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी अन्य कार्यकर्त्यांना आपले मंत्रिमहोदय काल शहरात येऊन गेले, अशी माहिती मिळते. कार्यकर्त्यांनी मंत्री अन् मंत्र्यांनी कार्यकर्ते वाटप करून घेतल्याचे चित्र सध्या शहर भाजपमध्ये आहे. सत्ता नसताना मात्र सर्व नेते अन् कार्यकर्ते समान होते.

कार्यकर्त्यांनी मंत्र्यांना भेटलेच पाहिजे
कोणताही नेता येणार असेल तर सर्व कार्यकर्त्यांपर्यंत निरोप देण्याची यंत्रणा आमच्याकडे होती. मध्येच ती का बंद पडली हे बघून ती तातडीने सुरू करण्यात येईल. कार्यकर्त्यांना मंत्र्यांपासून दूर ठेवण्याचा प्रश्नच नाही. उलट जास्तीत जास्त कार्यकर्ते मंत्र्यांना भेटले पाहिजेत, असा आमचा आग्रह असतो. यापुढे तुम्हाला चित्र बदललेले दिसेल. अतुलसावे, आमदार, भाजप.
बातम्या आणखी आहेत...