आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: उन्हाळ्यात पाण्याची नासाडी, रस्ते जलमय; औरंगाबाद मनपला नाही सोयरसूतक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद शहराला अनेक वर्षांपासून तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. ग्रामीण भागात तर भयावह परिस्थिती आहे. एकीकडे पाण्याचे दुर्भिक्ष असताना प्रशासनाच्या करंटेपणामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. औरंगाबाद रेल्वेस्टेशनलगत असलेल्या पैठण रोड उड्डाणपुलाखाली पाण्याचा व्हॉल्व नादुरस्त असल्यामुळे रविवारी रात्री 1 वाजेपासून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. व्हॉल्वमधून होणाऱ्या पाण्याच्या अव्याहत प्रवाहाने स्टेशन परिसरातील जालाननगरचे रस्ते जलमय झाले आहेत. चार दिवसांपूर्वीच व्हॉल्व खराब झाल्यामुळे चितेगावजवळ चार तास 100 फूट उंच फवारे उडत होते. 
 
पुढील स्लाइडवर पाहा, रेल्वेस्टशन परिसरातील कृत्रिम नदी, चितेगावचा फवारा व्हिडिओ

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...