आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज बिलात तीन लाखांची बचत, औरंगाबाद रेल्वेस्थानकावरील वीज वापर लाखावरून साठ हजारांवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रेल्वेनेवीज बचतीसाठी अनोखा फंडा वापरत गेल्या तीन महिन्यांत आैरंगाबाद स्थानकाचे अकरा लाख रुपयांचे वीज िबल लाख ८० हजार रुपयांवर आणले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वीज बचतीचा सल्ला प्रशासनाने प्रत्यक्ष कृतीत आणला आहे. सीएफएल, टी-५, एलईडी, टायमर्स, अ‍ॅक्युपन्सी सेन्सर सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज बचतीचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे.

रेल्वे बोर्डाने वीज बचतीचे अभियान सुरू केल्यानंतर रेल्वेच्या सोळा झोनमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झाली. दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबादच्या वतीने वीज बचतीची सूचना करण्यात आली होती. हा प्रयोग नांदेड, पूर्णा आैरंगाबाद येथे करण्यात आला.

७०: ३० टक्क्यांचा फॉर्म्युला
इकोफ्रेंडली व्यवस्थेद्वारे विजेची बचत करण्यावर रेल्वे प्रशासनाने भर दिला. गाडी येण्यापूर्वी पंधरा मिनिटे आधी गेल्यानंतर पंधरा मिनिटे असे केवळ अर्धा तासच दिवे सुरू ठेवण्यात येतात. गाडी गेल्यानंतर सत्तर टक्के दिवे बंद ठेवण्यात येतात. रेल्वे नसलेल्या कालावधीत केवळ ३० टक्के दिवे सुरू ठेवले जातात.

असाआहे कालावधी
आैरंगाबादरेल्वेस्थानकावर पाच प्लॅटफाॅर्म असून, यातील तीन प्लॅटफॉर्मचा वापर प्रभावीपणे करण्यात येतो. चार पाच क्रमांकाचे प्लॅटफॉर्म मालगाड्यांसाठी वापरात आहेत. आैरंगाबादेत प्रतदि.िन साठपेक्षा जास्त रेल्वेगाड्या धावतात. यातील २५ ते २७ रेल्वे सायंकाळी सात ते पहाटे सहा वाजेदरम्यान धावतात. रात्रीच्या वेळी रेल्वे नसलेल्या कालावधीत केवळ ३० टक्के दिवे सुरू असतात. यात दिवे, पंखे, डिजिटल रेल्वेचे वेळापत्रक आदींचा समावेश आहे.
रात्री ९.५६ वाजता गाडी आल्यानंतर ७० टक्के दिवे सुरू होते.

वीज बिलात कपात
सर्वदिवे रात्रभर सुरू ठेवल्यामुळे महिन्याला रेल्वेस्थानक आैरंगाबाद परसिरासाठी एक लाख युनिट महिन्याला लागायचे. त्याचे ११ लाख रुपये रेल्वेला द्यावे लागायचे. ७०: ३० टक्के फॉर्म्युल्यामुळे महिन्याला लाख ८० हजार रुपये बिल येत आहे. लाख युनिटऐवजी आता महिन्याला साठ हजार युनिटचेच बिल येते.

असे वापरले तंत्रज्ञान
सीएफएलचेबल्ब वापरल्याने विजेची बचत झाली. टी-५ सिस्टिमचे विजेचे ट्यूब स्थानकावर वापरले. एलईडी सिस्टिमही वापरली गेली. रेल्वे गेटवरील दिवे तेथील खोलीसाठी सौर ऊर्जेवरील दिवे वापरात आणले. आैरंगाबाद परसिरातील ३० गेटवर ही व्यवस्था कार्यान्वित केली. रेस्ट हाऊस, रनिंग रूममध्ये सौर ऊर्जेचा वापर झाला. रूममध्ये व्यक्ती आल्यानंतर सुरू होणारी व्यक्ती रूमच्या बाहेर गेल्यास बंद होणारी अ‍ॅक्युपन्सी सेन्सर पद्धत अमलात आणली. रेल्वेस्थानक परसिरातील अनेक दिवे टायमरवर लावण्यात आले आहेत.