आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात चौपट पाऊस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अवर्षणामुळे सहा महिन्यांपासून औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला. मात्र, यंदा पावसाने लवकर वर्दी देऊन शेतकर्‍यांसह सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत झालेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार गतवर्षीच्या तुलनेत यंदा चौपट पाऊस झाला आहे. गतवर्षी जिल्ह्यात 19 जूनपर्यंत 225 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा या तारखेपर्यंत 965 मिलिमीटर पाऊस झाला आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 16 टक्के इतका पाऊस झाला आहे.

जोरदार पावसामुळे दुष्काळाची तीव्रता झपाट्याने कमी होत आहे. जूनपर्यंत जिल्ह्यातील टँकरची संख्या 735 इतकी होती. गेल्या 18 दिवसांत ती 69 ने कमी होऊन 666 पर्यंत आली आहे. येत्या सोमवारपर्यंत ही संख्या निम्म्यानेही कमी होईल, असा अंदाज आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील 115 पैकी केवळ दोनच छावण्या सुरू आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात चारा छावण्या तसेच टँकरवर आतापर्यंत 65 कोटींच्या वर खर्च झाला आहे. टँकर आणखी काही दिवस सुरू राहतील, असा अंदाज आहे.

मात्र, पुढील 12 दिवसांत दररोज टँकरचा आकडा खाली येईल, असे सूत्रांनी म्हटले आहे. पेरणीचे प्रमाणही 40 टक्क्यांपर्यंत पोहोचले असून यात औरंगाबाद तालुक्यासह सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री, कन्नड आणि फुलंब्री हे तालुके आघाडीवर आहेत. काही ठिकाणी पुरेसा पाऊस न झाल्याने कपाशी, मका वगळता अन्य पिकांच्या पेरण्या थांबल्या आहेत.

असे आहे जिल्ह्यातील चित्र
40 टक्क्यांपर्यंत पेरणी
65 कोटी टँकरवर खर्च
225.30 मि.मी.गतवर्षी 19 जूनपर्यंतचा पाऊस
965.48 मि.मी. या वर्षी आतापर्यंत