आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादवर आभाळमाया- जिल्‍ह्यात सकाळपासूनच सरीवर सर, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादेतही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. गेल्‍या तीन ते चार दिवसांपासून हुलकावणी देणारे काळेकुट्ट ढग अखेर बरसत आहेत. रविवारी दुपारी पावसाने शहराला चांगलेच झोडपले. त्‍यानंतर सोमवारपासून अधून-मधून पाऊस औरंगाबादकरांना भिजवत आहे.
- आज सकाळपासूनच सरीवर सरी कोसळत असल्याने संपूर्ण शहरभर पाणी झाले आहे.
- गल्लीबोळांसह रस्ते, नाले ओसंडून वाहत आहेत.
- सखल भागात डबकी साचली आहेत.
- पावसामुळे शहरातील बाजारपेठाही चिखलमय झाल्‍या आहेत.
- रस्‍त्यावरील गड्ड्यांमध्‍ये पाणी साचल्‍याने वाहनचालकांची चांगलीच त्रेधा उडाली आहे.
पर्यटकांची वर्दळ वाढली..
अजिंठा, वेरुळसह विद्यापीठातील लेण्‍या हिरवळीने नटल्‍या आहेत. शिवाय धबधब्‍यांनी येथील देखावे अधिकच खुलून दिसत आहेत. त्‍यामुळे पर्यटनस्‍थळी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. शनिवार आणि रविवारी या ठिकाणी विशेष वर्दळ दिसते.
पुढील स्‍लाइड्सवरील फोटोंमधून पाहा, औरंगाबादेत असा झाला पाऊस..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...