आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेन वॉटर हार्वेस्टिंग : 25 दिवसांत 100 ठिकाणी राबवला प्रकल्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मागील वर्षीच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर या वर्षीही सकल मारवाडी युवा मंच आणि डीबी स्टारच्या संयुक्त विद्यमाने ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर अत्यंत कमी खर्चात रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम राबवला जात आहे. यास शहरामधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत २५ दिवसांमध्ये शहरातील १०० ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात आला. अवघ्या दोन दिवसांमध्ये प्रकल्प पूर्ण करून दिला जात आहे. 
 
साधारणत: एका बंगल्यामध्ये रेन वाॅटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प उभारण्यासाठी १० ते १२ हजार रुपये खर्च येतो. मात्र, सकल मारवाडी युवा मंचच्या वतीने केवळ साडेतीन ते साडेचार हजारांमध्ये हे काम पूर्ण करून दिले जात आहे. बाजारामध्ये लवकर प्लंबर मिळत नाहीत. साहित्य कोठून आणायचे हेदेखील लोकांना माहीत नसते. ही अडचणही मंचने सोडवली आहे. मंचतर्फे प्लंबर साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. यासाठी फिल्टर सेट, पाइप, एल्बो, टी, क्रोल, क्लँप, खिळे, सोल्युशन, सिमेंट, जाळी, एम-सील आणि वाहतुकीचा खर्च लागतो. घराची रचना उपलब्ध जागेनुसार खर्चाच्या रकमेत थोडाफार बदल होतो. ‘देवास रुफ वॉटप फिल्टर’ आणि ‘रिचार्ज पीट’ या दोन पॅटर्ननुसार हे काम केले जात आहे. 
 
पावसाळ्यातही सुरू ठेवणार :ही मोहीम शक्यतो स्वतंत्र बंगल्यांसाठी घरांसाठी आहे. मात्र, अपार्टमेंटमधील सर्व फ्लॅटधारकांनी एकत्र निर्णय घेतल्यास सर्वांसाठी सामायिक प्रकल्प उभारला जाईल. आता पावसाळ्यातही हा उपक्रम सुरूच ठेवण्याचे मंचने ठरवले आहे. 
 
जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा : हाउपक्रम ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर राबवला जात आहे. यामध्ये साहित्याचे पैसे आणि लेबर चार्जेस आकारले जातील. यासाठी मंचने डीलरसोबत करार केलेला आहे. त्यानुसार होलसेल भावात साहित्य घेतले पुरवले जाईल. इच्छुकांनी दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर आपले नाव, पत्ता मोबाइल नंबर मेसेज करावा. त्यानंतर प्लंबर घरी येऊन भेट देतील आणि पाहणी करून प्रकल्प समजावून सांगतील. तसेच कोटेशनद्वारे संपूर्ण खर्चाचा तपशील दिला जाईल आणि एक ते दोन दिवसांत काम पूर्ण करून दिले जाईल. साहित्याचे पैसे तेव्हाच द्यावे. लेबर चार्जेस काम झाल्यावर द्यावे. 
 
यांच्याशी साधा संपर्क 
इच्छुकांनी अशोक शिवाल (९८२२१२१२८६), आशिष मेहता (९८८१३०१३०८), प्रतीक अग्रवाल (९९२२९६६३७९), निमिश अग्रवाल (७७०९९१७७७७), सचिन बंग (९४२२०२२२५३), अक्षय बाहेती (९५२३३४४४४४), मधुर अग्रवाल (९५७९४६३००१) यांच्याशी संपर्क साधावा. 
बातम्या आणखी आहेत...