आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या तंबीनंतर घर केले रिकामे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भाड्याने घेतलेले घर बळकावण्याचा प्रयत्न करणार्‍या भाडेकरूला पोलिसांनी तंबी देताच गुरुवारी घर रिकामे करण्याची तयारी भाडेरूने दर्शवली.
पोलिस प्रशिक्षण केंद्र चालवण्यासाठी भगवान नागरे यांनी सिडको एन-1 भागातील एका बंगल्यातील खोली भाड्याने घेतली होती. करार संपल्यानंतरही ते घर सोडण्यास तयार नव्हते. त्यांच्या या वागण्यामुळे वृद्ध दांपत्य जेरीस आले. त्यांनी थेट पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया यांची भेट घेतली. सर्व कैफियत सांगितली. पोलिसी हिसका दाखवताच नागरे घर सोडणार असल्याचे पोलिसांना सांगितले. घाटी रुग्णालयातील निवृत्त अधिकारी किशोर सरोदे (62) यांच्या मालकीचा बंगला आहे. या बंगल्यातील एक खोली एप्रिल 2011 मध्ये नागरे यांनी 11 महिन्यांच्या करारावर भाड्याने घेतली होती.
एप्रिल 2012 मध्ये करार संपुष्टात आला आणि सरोदे यांनी घर रिकामे करण्याची मागणी केली. तेव्हा नागरे यांनी टाळाटाळ केली. पोलिसांची भीती दाखवून एकदा आम्हाला कोंडून ठेवले त्यामुळे माझी प्रकृती बिघडली, असे सरोदे यांनी पोलिस उपायुक्तांना सांगितले. उपायुक्त चावरिया यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि नागरे यांना घर रिकामे करण्याची तंबी दिली.
कोण आहेत नागरे ?
नागरे जालना येथील पोलिस खात्यातून बडतर्फ झालेले आहेत. ते काही वर्षांपासून भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालवतात. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. त्यांनी तत्पूर्वी रिक्रुटमेंटसाठी कार्यालय उघडले. त्यांच्या कार्यालयात नोंदणीसाठी आलेल्या आरती आणि उज्ज्वला नावाच्या तरुणी 1996 मध्ये बेपत्ता झाल्या होत्या.