आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पी.एल. सोरमारेंचा अंत्यविधीतून काढता पाय, मानिसक त्रासातून ओढवला मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चौधरी यांच्या पत्नी सरस्वती यांचे सांत्वन करताना महिला. (इन्सेट) मृत गजानन चौधरी. (छाया : जमीर शेख ) - Divya Marathi
चौधरी यांच्या पत्नी सरस्वती यांचे सांत्वन करताना महिला. (इन्सेट) मृत गजानन चौधरी. (छाया : जमीर शेख )
खुलताबाद / औरंगाबाद - येथील रहिवासी व जिल्हाधिकारी कार्यालयात गौण खनिज विभागात अव्वल कारकून पदावर कार्यरत गजानन एकनाथ चौधरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित अधिकाऱ्यांसमोर चौधरींच्या पत्नीने अधिकारीच माझ्या पतीच्या मृत्यूला जबाबदार आहेत, असा आरोप करत संबंधितावर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
 
अंत्यविधीच्या कार्यक्रमादरम्यान नातेवाइकांचा रोष पाहून अपर जिल्हाधिकारी पी.एल.सोरमारे यांनी  काढता पाय घेतल्याचे दिसून आले.  
 
चौधरी हे गौण खनिज विभागात कार्यरत होते. त्यांच्यावर या विभागाच्या कामकाजाची जबाबदारी होती. त्यामुळे कामाचा अधिक भार त्यांच्यावर होता. यामुळे कामाचा संदर्भात प्रशासनाला त्यांनी लेखी पत्रही दिले होते. पण दोन दिवस उलटत नाही तोच त्यांचा गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी ३ वाजता चौधरी यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यादरम्यान चौधरी यांची पत्नी सरस्वती म्हणाल्या की, ते नेहमी मानसिक तणावात असायचे. त्यातच कामाचा वाढता ताण आणि अधिकारी त्यांना नेहमी ऑफिसमध्येच बसवून ठेवत असत. काम आटोपून निघाले तरी अधिकारी त्यांना अर्ध्या रस्त्यातून बोलावून घ्यायचे. त्यामुळे ते नेहमी रात्री उशिरा घरी येत होते. त्यातच त्यांना नोटीस बजावल्याने त्यांच्या तणावात आणखीच भर पडली. 
 
त्यांनी संघटनेच्या अध्यक्षांना त्रासाबद्दल माहिती दिली होती.  अधिकारी वाळूमाफियांकडून हप्ते वसूल करण्यास त्यांना भाग पाडत, असेही त्या म्हणाल्या. त्यामुळे त्यांना ताण आल्याने हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी विविध अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौधरी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. अपर जिल्हाधिकारी सोरमारे यांच्याकडे  अंत्यविधीच्या कार्यक्रमादरम्यान चौधरी यांच्या पत्नीने धाव घेत तुम्हीच माझ्या पतीच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे सांगताच त्यांनी अंत्यविधीच्या १० मिनिटे अगोदर कार्यक्रमस्थळाहून काढता पाय घेतला. या वेळी विभागीय उपजिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, तहसीलदार अरुण जऱ्हाड, कन्नडचे तहसीलदार विनोद गुंडमवार, बदनापूरचे तहसीलदार महेश सुधाकर, कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष डी. एम.देशपांडे, जिल्हाध्यक्ष महेंद्र गिरगे आदी उपस्थित होते.
 
कर्मचारी संघटनेने पुकारला जिल्हा बंद 
औरंगाबाद महसूल कर्मचारी संघटनेने या घटनेच्या निषेधार्थ औरंगाबाद जिल्हा बंद पुकारला आहे. शुक्रवारी सकाळपासूनच अनेक कर्मचारी घाटीमध्ये दाखल झाले होते. जिल्हा प्रशासनाचा हा निष्काळजीपणा आहे. निवेदन दिल्यानंतर गौणखनिज विभागात एका कर्मचाऱ्याची ४ दिवसांपुरती ऑर्डर काढण्यात आल्याची माहिती गिरगे यांनी दिली आहे. तसेच मराठवाड्याल्या सर्व महसूल कर्मचारी संघटनाकडून याबाबत विचारणा करण्यात येत असून याबाबत मराठवाडा बंद करण्याचा निर्णय देखील घेण्यात येणार असल्याची माहिती गिरगे यांनी दिली.
 
गौण खनिज विभागात गजानन चौधरी एकमेव कर्मचारी होते कार्यरत
जिल्हाधिकारी कार्यालयातल्या गौणखनिज विभागात जी.ई.चौधरी हे केवळ एकच अव्वल कारकून आहेत. गौणखनिज विभागात कामाचा ताण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सर्व कामाचा भार त्यांच्यावर पडतो. त्यामुळे चौधरी आणि कर्मचारी संघटनेने अप्पर कार्यालयांना निवेदन दिले होते. कार्यालयतली पदे भरा अन्यथा जिवाचे बरे वाईट करून घेईल,असा इशारा औरंगाबाद जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला होता.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, गजानन चौधरी म्हणाले होते, कर्मचारी द्या, अन्यथा स्वत:चे बरेवाईट करून घेईल... 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...