आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले... वर्षभरातच बहुतांश बंदही पडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पहिल्या टप्प्यात कोटी खर्च करून शहरभरात मुख्य रस्त्यांवरील ३० चौकांत ५० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. पण वर्षभरातच बहुतांश बंद पडले. तीन वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असणारा ठेकेदार बिलच दिले नसल्याचे सांगत दुरुस्ती करत नाही. कामाची गुणवत्ता तपासण्याचे काम बाकी असल्याचे म्हणत मनपा पेमेंट देत नाही. दुसरीकडे महावितरणने कॅमेऱ्यांच्या विजेचे लाखांचे बिल थकल्याचे सांगत इशारा दिला आहे. या सगळ्या त्रांगड्यामुळे गाजावाजा करत आणलेला हा सेफ सिटी प्रोजेक्टच अनसेफ झाला आहे.
 
औरंगाबाद शहरात ‘सेफ सिटी प्रोजेक्ट’ राबवण्याच्या दृष्टीने १९ जानेवारी २०१५ राेजी गृह राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, मनपा आयुक्त आणि पोलिस अधीक्षकांसमवेत विशेष बैठक झाली होती. औरंगाबाद हे राज्यातील पाचव्या क्रमांकाचे शहर आहे. वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, पैठण आदी औद्याेगिक वसाहतींमुळे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली वाढत आहे. या सर्व विकासाबरोबरच गुन्हेगारीतही वाढ होत आहे. त्यातच वाढणारे अपघात, वाहतुकीची सुरक्षा एकूणच शहराची सुरक्षेवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची मदत घेणे अपरिहार्य असल्याच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाली. 

काय ठरले होते बैठकीत ? 
त्यादृष्टीनेसेफ सिटी प्रकल्प पोलिस आयुक्त कार्यालयातर्फे आणि महानगरपालिकेच्या सहकार्याने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रकल्प उभारणीची जबाबदारी मनपावर टाकण्यात आली. यासाठीचा निधी जिल्हा नियोजन विकास समितीकडून उपलब्ध करून घेण्यात येईल असे ठरले. तातडीने तांत्रिक सल्लागाराची निवड करून हे काम मार्गी लावण्याचे मनपा आयुक्तांना सांगण्यात आले. याच बैठकीत प्रकल्पावर पोलिस खात्यामार्फत समन्वयक म्हणून पोलिस उपायुक्त (मुख्यालय) यांची निवड करण्यात आली होती. 

अशी होती योजना 
या प्रकल्पांतर्गत आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा, व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिम, कमांड कंट्रोल रूम उभारणे वाहतुकीच्या दृष्टीने उपाययोजना निर्माण करणे आदी कामांचा समावेश होता. ही कामे मनपा आणि पोलिस आयुक्त कार्यालयाशी समन्वय ठेवून दोन टप्प्यांत पूर्ण केली जाणार होती. पहिल्या टप्प्यात कोटी दुसऱ्या टप्प्यात १० कोटी खर्चाचे अंदाजपत्रक केले गेले. त्याला मनपा आयुक्तांनी १८ फेब्रुवारी २०१५ रोजी मान्यता दिली. यानंतर तीन वर्षांच्या देखभाल दुरुस्तीच्या अटीवर १३ सप्टेंबर २०१५ रोजी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा कार्यारंभ आदेश मुंबईतील हॉनिवेल ऑटोमेशन प्रा. लि. कंपनीला देण्यात आले. 

कालच संबंधितकंपनीचे अभियंते शहरात दाखल झालेले आहेत. आठ ते दहा कॅमेरे बंद होते.कालपासून दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. लवकरात लवकर सर्व कॅमेरे दुरुस्त होतील. माधवकोरंटलू, पीएसआय,पोलिस नियंत्रण कक्ष 

येथे बसवले कॅमेरे 
पहिल्या टप्प्यात शहरातील ज्युबिली पार्क, मिल कॉर्नर, कार्तिकी चौक, सिडको बसस्टँड, रेल्वेस्टेशन, बाबा पेट्रोल पंप, जालना रोड, अमरप्रीत सिग्नल, क्रांती चौक, आकाशवाणी, सेव्हन हिल्स, जळगाव टी पॉइंट, एन-१ सिग्नल, गरवारे चौक, आंबेडकर चौक, टीव्ही सेंटर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अण्णाभाऊ साठे चौक, भडकल गेट, सिटी क्लब, शहागंज, गजानन मंदिर चौक आदी मुख्य रस्त्यांवरील ३० चौकांत ५० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. 

वर्षभरातच अनसेफ 
मात्र,वर्षभरातच या बहुतांश कॅमेऱ्यांची दुर्दशा झाली. किती नादुरुस्त आहेत याचीही स्पष्ट माहिती संबंधितांकडे नाही. देखभाल दुरुस्तीअभावी खराब झालेले हे कॅमेरे खांबासहित दुभाजक, वाहतूक बेट, सौदर्य बेटांची ‘शोभा' वाढवत आहेत. केबल खराब झाली असून पॅनल सर्किट आणि कंट्रोल पॅनलमध्ये बिघाड झाला आहे. कॅमेरे थेट महावितरणच्या पोलवर बसवून थेट पॉवर सप्लाय देण्यात आला आहे. त्यामुळे कंट्रोल पॅनल बॉक्समधील बॅटरी, इलेक्ट्राॅनिक कंट्रोल सर्किट आणि फ्यूज वीजपुरवठाची पॉवर वाढताच शॉर्टसर्किट होतात. 

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत 
रस्तारुंदीकरणादरम्यान आणि भूमिगत गटार योजनेच्या दरम्यान केबल तुटल्याने काही चौकांतील कॅमेरे बंद असण्याची शक्यता आहे. त्यांची तीन वर्षांपर्यंत देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे. त्यांना याबाबत तातडीने पत्र देऊन कॅमेरे दुरुस्त करणार आहोत. 

अनेकखांबावर दोनऐवजी एकच कॅमेरा दिसतो 
नाही,काही कॅमेरे दुसऱ्या बाजूने लावले आहेत. पण तुम्ही व्यक्त केलेली शंका आम्ही तपासून पाहू. अद्याप या कामाचे मोजमाप झालेले नाही. त्यात आम्ही हा मुद्दा तपासू. 

दुरुस्ती आणि मोजमाप कधी होणार? 
जिल्हानियोजन विकास समितीने मनपाकडे निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामाच्या तांत्रिक बाबी तपासण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेे आहेत. थर्डपार्टी तपासणी सुरू आहे. एकदा ठेकेदाराची देयके दिली की मग ही सर्व कामे सुरळीतपणे पूर्ण होतील. 

दुसरा टप्पा कागदावरच 
पहिल्या टप्प्यात ३० चौकांत कोटींचे ५० सीसीटीव्ही कॅमरे बसवण्यात आले. मात्र दुसऱ्या टप्प्यातील १० कोटींच्या कामातून होणारे पब्लिक अॅड्रेस सिस्टिम, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा वगैरे बसवण्यात येणार होते. पण हे काम कागदावरच आहे. 

या कामाचाएक पैसाही आम्हाला दिला नाही. एमएसईबीचे बील थकल्याने कॅमेरे बंद असल्याचे कळाले. सहा कॅमेरे बंद आहेत. आम्ही पोलिस आयुक्तांनाही याबाबत तक्रार केली. त्यांनी मनपा आयुक्तांनाही पत्रव्यवहार केलास, पण काहीच झाले नाही. पैसे मिळाल्याशिवाय देखभाल दुरुस्ती करणार तरी कशी? अभयजोशी, प्रकल्पव्यवस्थापक, हॉनिवेल ऑटोमेशन प्रा.लि,मुंबई 
सिटी क्लबलगत ज्या खांबावर कॅमेरा बसवला त्याची अवस्था. 

 
बातम्या आणखी आहेत...