आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दमडी महल, चंपा चौक ते जालना रस्ता रुंदीकरणात आहे ४५० इमारतींचा अडसर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विकासआराखड्याच्या कागदावर दिसणारा चंपा चौक मार्गे दमडी महल ते जालना रोड या अडीच किलोमीटर लांबीच्या नियोजित रस्त्यावर दमडी महल येथे पुलाचे काम सुरू आहे. लवकरच रस्ताही होईल, अशी अनेक वाहनधारकांची अपेक्षा आहे. प्रत्यक्षात हा रस्ता रुंद करून जालना रोडला जोडणे हे मोठे आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे. एक मिशन म्हणून मोहीम हाती घेतली तरच हा रस्ता होऊ शकतो.

चंपा चौकापर्यंत हा रस्ता रुंद झालेला असला तरी पुढे जालना रोडपर्यंत या नियोजित रस्त्याच्या जागेवर तब्बल साडेचारशेवर बांधकामे आहेत. या इमारती काढल्या तर दमडी महल येथे वाय आकाराचा रस्ता तयार होऊन जिल्हाधिकारी कार्यालय तसेच टीव्ही सेंटर येथून जालना रस्त्यावर येणे सुखकर होणार आहे.

दमडी महलच्या परिसरातील काही झाडे तोडावी लागणार असल्याने तसा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाकडे आला आणि पुन्हा एकदा या रस्त्याची चर्चा सुरू झाली. शक्य तेवढी झाडे वाचवावीत अन् नंतरच रस्त्याचे काम करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 'दिव्य मराठी' प्रतिनिधीने दमडी महल येथे पाहणी केली असता येथील मोठी तीन झाडे तोडावी लागणार आहेत. पुढे या रस्त्यावर फारशी वृक्ष नाहीत. परंतु ऐन रस्त्यावर बांधण्यात आलेली बांधकामे हेच मोठे आव्हान या रस्त्याच्या निर्मितीत उभे ठाकलेले दिसते. त्यामुळे महापालिकेची भूमिकाच महत्वाची ठरणार आहे.

अंतर अन् वेळही वाचेल
आज जिल्हाधिकारी कार्यालयापासून आकाशवाणीपर्यंत जायचे असेल तर दोन पर्याय आहेत. एक तर शहागंज, मोंढा आणि पुढे आकाशवाणी असे साडेतीन किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. दुचाकीस्वार चंपा चौकातून पुढे जाफर गेट येथून आकाशवाणीकडे जातात. त्यांना साधारण तीन किलोमीटर अंतर पार करावे लागते. मोठे वाहन असल्यास टीव्ही सेंटर, सेव्हन हिल असे वळण घेत आकाशवाणी येथे पोहोचता येते. त्यासाठी किलोमीटर अंतर पार करावे लागते, परंतु हा रस्ता झाला तर अडीच किलोमीटर अंतर सर्व वाहनांना पार करावे लागेल. यामुळे सर्वांचाच वेळ वाचेल. कारण पर्याय असलेल्या दोन्हीही रस्त्यांवर कमालीची वर्दळ असते.

चंपा चौक ते जालना रोड या सुमारे एक किलोमीटरपर्यंत जवळपास साडेचारशे मालमत्ता या रस्त्यावर येतात. { सुमारे ते १० एकर जागा पालिकेला मोकळी करावी लागेल.

२०१२ पासून तीन वेळा या रस्त्याचे मार्किंग झाले आहे.
रस्त्याची रुंदी
३० मीटर (१००फूट)
रस्त्याची लांबी
२५०० मीटर (अडीचकिमी)
पुलाचा फायदा
पुढेरस्ता नसतानाही पालिकेने पुलाचे काम हाती घेतले. रस्ता झाला नाही तरी या पुलाचा फायदा वाहनधारकांना होणार आहे. आता मोठी वाहने पंचायत समिती येथील रस्त्यावरून चंपा चौकाकडे येऊ शकत नाहीत. पुलामुळे ती येऊ शकतील. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मोठी वाहने चंपा चौक, रोशन गेटकडे आरामात जाऊ शकतील.

असा होईल 'वाय' मार्ग :
टीव्ही सेंटरकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पंचायत समिती येथून या रस्त्याकडे वळता येईल. दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टीव्ही सेंटरकडे जाणारा रस्ता येथे जोडला जाईल. दोन रस्ते वाय आकारात या रस्त्याला जोडले जातील पुढे हा रस्ता जालना रस्त्याला लागेल. तेथून या रोडने गेल्यास जिल्हाधिकारी कार्यालय किंवा टीव्ही सेंटरकडे वळण्यासाठी वाय आकारात पर्याय असेल.

खास बाब म्हणून विचार करावा लागेल
विकासआराखड्यात हा रस्ता दाखवण्यापूर्वीच म्हणजे १९९१ पूर्वीच येथे बांधकामे झाली होती. बांधकामे झाल्यानंतर हा रस्ता विकास आराखड्यात समाविष्ट करण्यात आला. येथे कोणतेही लेआऊट नव्हते. अनेकांनी बाँडवर व्यवहार केले आहेत, तर अनेकांकडे कागदपत्रेच नाही. त्यामुळे येथील ालमत्ता पाडताना रहिवाशांना खास बाब म्हणून अन्यत्र भूखंड देण्याचा विचार करावा लागेल. (कैलासनगर तसेच किलेअर्क येथील मालमत्ताधारकांसाठी अनुक्रमे हर्सूल पडेगाव येथे भूखंड देण्यात आले.) तरच येथील नागरिक मालमत्ता पाडू देतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

पंचायत समिती कार्यालयापासून या रस्त्याची सुरुवात होईल. जुना दमडी महल पाडण्यात आला आहे. त्यापुढे असलेल्या नाल्यावर पूल उभारणीचे काम सुरू आहे. त्यावरून हा रस्ता पुढे चंपा चौकातून जाईल. चंपा चौकापासून पुढे बांधकामे आहेत. तेथून हा रस्ता सरळ जालना रोडवर असलेले रेमंड शोरूम मुळे डायग्नोस्टिक सेंटर या दोन इमारतींच्या मध्ये जालना रोडला मिळेल.

पूल होण्यापूर्वी रुंदीकरण करू
^यारस्त्याचेआम्ही मार्किंग केले आहे. ऐन रस्त्यात बांधकामे असली तरी पुलाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच आम्ही रस्ता मोकळा करू. नक्कीच एक मिशन म्हणून मोहीम हाती घेतली जाईल. ओमप्रकाशबकोरिया, आयुक्त.

यापूर्वीचे मिशन
पानदरिबा येथे असेच चित्र होते. साधी बोळही नव्हती. पूर्ण रस्त्यावर बांधकामे झाली होती. तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी एक मिशन म्हणून येथे रुंदीकरण केले. सर्व मालमत्ता काढून रस्ता मोकळा केला. त्यामुळे त्या भागातील वर्दळ कमी झाली.
बातम्या आणखी आहेत...