आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण्यांना खड्डे दिसत नाहीत, सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणार कोण?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महापालिकेत प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक शहरातील चाळण झालेले रस्ते आणि खड्डय़ांबाबत बेपर्वा आहेत. चिश्तिया चौकात खड्डे चुकवण्याच्या नादात झालेल्या अपघातात एका अभियंत्याला जीवास मुकावे लागले. मात्र, ज्यांच्याकडे संसदीय आयुध आहे ते आमदारसुद्धा त्यांचे घर आणि जनसंपर्क कार्यालयासमोरील खड्डय़ांबाबत कमालीचे बेफिकीर आहेत. ‘हाय सस्पेन्शन’च्या महागड्या, चमचमीत मोटारगाड्यांमधून खड्डेयुक्त रस्त्यांवरून दररोज जाणार्‍या लोकप्रतिनिधींना त्यांच्या घरासमोरील खड्डे दिसत नाही काय, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

मागील दोन आठवड्यांपासून ‘दिव्य मराठी’ने जीवघेण्या खड्डय़ांबाबत वृत्तमालिका सुरू केली आहे. नागरिकांचे कंबरडे मोडणार्‍या खड्डय़ांचा माग काढत ‘दिव्य मराठी’चे प्रतिनिधी आजी-माजी आमदार, खासदार, यांच्या घरासमोर पोहोचले तेव्हा विदारक चित्र दिसले. दररोज ये-जा करणार्‍या काही लोकप्रतिनिधींच्या घरासमोर तर काहींच्या जनसंपर्क कार्यालयासमोर भलेमोठे खड्डे पडले आहेत. मात्र, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू असताना कोणत्याही सदस्याने सदनात खड्डय़ांबाबत जाब विचारला नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न लोकांना पडला आहे.