आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीर रामेश्वरनेच केला भावजयीचा खून, खुनातील आरोपीस अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वानखेडेनगरातील रोहिणी सोनवणे हिच्या खुनातील संशयित दीर रामेश्वर साेनवणे याला गुरुवारी बेगमपुरा पोलिसांनी अटक केली. जवाहरनगर भागात फिरताना पोलिसांना तो सापडला.

दोन दिवसांपूर्वी रोहिणी सोनवणे हिचा खून झाल्याची घटना घडली. या प्रकरणात तिचा दीर रामेश्वर सोनवणे याच्यावर संशय होता. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पोलिस सूत्रांकडून कळते. हा प्रकार अनैतिक संबंधातूनच झाला असल्याचे समोर आले आहे.
रामेश्वरच्या विरोधात देण्यात आलेल्या तक्रारीतदेखील तो रोहिणीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार सर्जेराव घानमोडे, विजय मोरे, प्रवीण पाटील, गोरख दाने, वाय. ए. खटाणे, अस्लम शहा यांच्या पथकाने ही कारवाई केली.