आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद मनपाचे विधान परिषदेत वाभाडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - समांतर जलवाहिनी, खड्डेमय रस्ते, बीओटीवरील जागा, मोकळ्या जागा हडपणे, शहर बस वाहतुकीचा बोजवारा, विविध योजनांतील भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांना हात घालत विरोधी पक्षातील सदस्यांनी शुक्रवारी (१० एप्रिल) विधान परिषदेत सरकारला धारेवर धरत औरंगाबाद महानगरपालिकेचे वाभाडे काढले.
विरोधा पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद या महानगरपालिका क्षेत्रातील विविध नागरी समस्यांसंबंधी प्रस्ताव सादर केला होता. या चर्चेत आमदार अमरसिंह पंडित, आमदार सतीश चव्हाण यांनी सहभाग नोंदवला. औरंगाबाद महापालिकेत विविध कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
तीनशे कोटींची समांतर जलवाहिनी योजना १२०० कोटींची झाली आहे. २००६ पासून या योजनेवर काम सुरू आहे, मात्र अद्यापही ही योजना पूर्ण झाली नाही. लोकांना पाणी देण्यापेक्षा या कामाचे कंत्राट कोणाला द्यायचे, त्यात किती वाटा मिळवायचा इतकीच काळजी महानगरपालिकेची सत्ता उपभोगणाऱ्यांनी घेतली असल्याचा आरोप आमदार यांनी केला.