आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Samantar Water Project Work Start In September

समांतर जलवाहिनीचे काम 1 सप्टेंबरपासून सुरू होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - 792 कोटी रुपयांच्या समांतर जलवाहिनी योजनेचे काम 1 सप्टेंबरपासून सुरू होणार असून आचारसंहितेआधी 20 ऑगस्टच्या आत भूमिपूजनही होईल. या प्रकल्पाच्या किमतीत 200 कोटींची वाढ झाली असून ही रक्कम राज्य सरकारकडून मिळवून देऊ, असा शब्द मनपाने कंपनीला दिल्यानंतर कामाचे गाडे एकदाचे हलले.

शिवसेनेने जंग जंग पछाडूनही अखेर लोकसभा आचारसंहितेच्या काळातच हे काम मार्गी लागले. प्रकल्पाचा 200 कोटींच्या वाढीव खर्चाची रक्कम कंपनीने उभारण्यास नकार दिला होता, तर मनपानेही नागरिकांना भुर्दंड बसू देणार नाही, अशी भूमिका घेत पैसे देण्यास नकार दिला होता. 3 महिन्यांनंतर गुरुवारी तोडगा निघाला. महापौर कला ओझा यांनी नागरिकांवर भुर्दंड पडणार नाही याची खबरदारी घेऊ, असे सांगितले. औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीचे उपाध्यक्ष जी.एस. बसू म्हणाले, वाढीव दरसूचीनुसार वाढीव खर्चाची काही रक्कम प्राप्त होऊ शकते. उर्वरित रकमेबाबत मनपाची मदत घेऊ. कंपनीचे 65 अभियंत्यांसह 200 कर्मचारी असून सप्टेंबरपासून मनपाचे 300 कर्मचारी हस्तांतरित होतील.