आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Selling Buying Federation Goes To Congress Nationalist Congress

औरंगाबाद खरेदी-विक्री संघ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाड - अत्यंत अटीतटीत झालेल्या औरंगाबाद तालुका शेतकरी सहकारी संघाची रविवारी सायंकाळी मतमोजणी झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस भाजप-शिवेसना युतीच्या पॅनलला समसमान प्रत्येकी सात जागा मिळाल्या आहेत. एक जागा यापूर्वीच बिनविरोध आल्याने हा शेतकरी संघ पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे.

औरंगाबाद तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या १५ संचालक निवडून देण्यासाठी करमाड औरंगाबाद शहरातील प्रत्येकी दोन अशा चार मतदान केंद्रावर रविवारी सकाळी ते वाजेदरम्यान मतदान घेण्यात आले. वैयक्तिक मतदारसंघात २,१३२ तर सहकारी संस्थेत ६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान संपल्यानंतर चार वाजेला औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनामध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. यात वैयक्तिक सभासद मतदारसंघात २०१५ वैध तर ११७ मते अवैध ठरली. सहकारी संस्था मतदारसंघात ६६ पैकी ५७ मते वैध तर मते अवैध ठरली. पहिल्यांदा सहकारी संस्था प्रतिनिधी मतदारसंघातील मोजणी करण्यात आली. या मतदारसंघात काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्मण देवराव औताडे (३५), मोहन रामभाऊ काळे (२७), गुलाब नारायण म्हस्के (२६), दत्तू कडूबा ठोंबरे ( ३०) हे तर भाजपचे अप्पासाहेब मारुती शेळके ( ३१) मते घेऊन विजयी झाले.

वैयक्तिक प्रतिनिधी मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे सुदाम भाऊराव उकर्डे (६३४), विश्वनाथ तुळशीराम पठाडे (६११), नाना अाण्णा पळसकर (६४९), तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे पुंडलिक त्र्यंंबक अंभोरे (६२९) अशोक नारायण काकडे (६००) मते घेऊन विजयी झाले. विमुक्त जाती भटक्या जमाती प्रतिनिधी मतदारसंघातून काँग्रेसचे देविदास रुपचंद चव्हाण (६८१) यांनी भाजपच्या रामजी चव्हाण (६८०) यांच्यावर एक मताने विजय मिळवला. इतर मागासवर्गीय मतदारसंघातून भाजपचे धनाजी तळेकर (६९७) यांनी काँग्रेसचे बबन जाधव यांचा (६७९) मतांनी पराभव केला.

उकर्डे, पवार विजयी
महिलाराखीव प्रतिनिधी मतदारसंघात भाजपच्या शशिकलाबाई पांडुरंग उकर्डे (६८३), छबाबाई दादाराव पवार (६८२) या विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या बेबी नंदिकशोर काकडे (६४६), कडूबाई कडूबा खुरमुटे (५५५) अपक्ष कडूबाई तांगडे (११) यांचा पराभव केला. सायंकाळी सात वाजता निवडणूक निर्णय अधिकारी दिनकर मसलेकर यांनी निकाल जाहीर केला. मतदान मतमोजणी कामात त्यांना आर.के. आर्य, अनिल इप्पर, बी.के. बेडवाल, एस.ई. ससाणे, डी.पी. किंबहुणे, एस.बी. दांडगे, व्ही.डी. कुलकर्णी, एस.एम. अभ्यंकर आदींनी सहकार्य केले.

खुलताबाद तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत किरण पाटील डोणगावकर यांच्या शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार.