आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : ‘जय शिवराय’च्या जयघोषाने आसमंत दुमदुमला, तरुणाईचा अभूतपूर्व उत्साह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रविवारी विविध संस्था, संघटनांच्या वतीने शहरात अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त जल्ल्ोषात मिरवणुका काढण्यात आल्या. शिवरायांचे जिवंत देखावे, बालनाटिका, शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक, दुचाकी रॅली आदी अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. जिजाऊ ब्रिगेडतर्फे क्रांती चौकातील पुतळ्यास गुलाबजलाचा अभिषेक करण्यात आला. विशेष म्हणजे, मराठा क्रांती मोर्चाच्या महिलांनी भगवे फेटे घालून क्रांती चौक ते टीव्ही सेंटर दुचाकी रॅली काढली होती. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, शहरातील शिवजयंती मिरवणुकीचे खास फोटो...
बातम्या आणखी आहेत...