आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लेखान्यात धडक कारवाई; कत्तल करणारे दोघे अटकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पालिकेच्या पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने गुरुवारी पहाटे साडेचार वाजता सिल्लेखान्यात घुसून जनावरांची कत्तल करणार्‍या दोघांना अटक केली. पाच सुरक्षारक्षकांसह डॉ. भगवान नाईकवाडे यांनी मोठय़ा जमावाचा सामना केला. पोलिस बळ उशिरा आल्याने फक्त 40 किलो मांस पथकाच्या हाती लागले. हे मांस नंतर नष्ट करण्यात आले.
बुधवारपासून पथकाने अवैध मांसविक्री तसेच जनावरांची कत्तल करणार्‍यांविरुद्ध कारवाई हाती घेतली आहे. पहिल्या दिवशी आंबेडकरनगर, जळगाव रोड, नारेगाव, मिसारवाडी येथे कारवाई करण्यात आली. या भागात दोघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. सिल्लेखान्यात बेकायदेशीरपणे जनावरांची कत्तल करण्यात येत असल्याची तक्रार नगरसेवक नासेर कुरैशी यांनी केली होती. पहाटे चार ते सहा या वेळेत ही कत्तल होत असल्याचे त्यांनी सांगितले होते.
त्यानुसार पथकाने पहाटे साडेचार वाजताच येथे सापळा लावला. पथक आल्याचे समजताच नागरिकांनी एका घराला समोरून कुलूप लावले. मागील दाराने त्यांनी काही मांस बाहेर पाठवून दिले. पोलिस आल्यानंतर कुलूप तोडण्यात आले तेव्हा आत दोन जण 40 किलोमांसासह आढळून आले. शाकेर जमील कुरैशी आणि अखिल अहेमद कुरैशी अशी त्यांची नावे असून त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.