आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलेशिया, सिंगापुरात औरंगाबादच्या गायिकेचे सूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादेतील तरुण पिढीतील नाट्य, चित्रपट कलावंत देश-विदेशात जाऊन सादरीकरण करत आहेत. त्यात शास्त्रीय गायकाचीही भर पडली असून येथील शास्त्रीय गायिका आरती पाटणकर यांनी नुकतीच मलेशिया सिंगापूर येथील मैफल गाजवली आहे. केंद्रीय सांस्कृतिक आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे आयोजित उत्तरकांती संगीत महोत्सवात त्यांनी बनारस घराण्याचे प्रतिनिधित्व केले. देशभरातून केवळ दोनच कलाकारांना या महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यात औरंगाबादच्या आरती यांचा समावेश होता.
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत येणाऱ्या इंडियन काैन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स म्हणजेच आयसीसीआर आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीने भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचार प्रसारासाठी विविध देशांमध्ये उत्तरकांती संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा मलेशियाची राजधानी क्वालालांपूर येथे हा महोत्सव झाला. ३० ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या या विदेश दौऱ्यात पाटणकर यांचे सप्टेंबर रोजी मलेशिया तर रोजी सिंगापूरमध्ये शास्त्रीय गायन झाले. क्वालालांपूरमधील आयसीसी ऑडिटोरियमध्ये ही मैफल रंगली होती. त्यास जगभरातील पर्यटकांनी हजेरी लावली होती.

वातावरणझाले भक्तिमय : पाटणकरयांनी उत्तर आणि दक्षिण भारतात समान दुवा असणारे राग सादर केले. यात त्यांनी बनारस घराण्याचे प्रतिनिधित्व करताना सुरुवातीला यमन रागातील “सौतन के घर ना जा’ ही बंदिश सादर केली. विरह रसातील ही बंदिश रसिकांना भावली. यानंतर संत कबीर यांच्या दोह्यांवर आधारित हंसध्वनी रागातील “लगन बिन लागे ना निर्मोही’ ही रचना सादर केली. भक्तिरसातील या रचनेने वातावरण भक्तिमय झाले. त्यांना तबल्यावर पंडित प्रकाश कंडास्वामी तर हार्मोनियमवर राहुल पारसनीस यांनी साथसंगत केली. याप्रसंगी आयसीसीआरचे सेकंड सेक्रेटरी शुषाेबन सेनगुप्ता यांनी पाटणकर यांचा सत्कार केला. दुसऱ्या दिवशी पाटणकर यांनी सिंगापूरमध्ये केलेल्या गायनालाही रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

बातम्या आणखी आहेत...