आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : डॉ. कबाडे रजेवर गेले; डॉ. तोगरीकर फरार झाले, रत्नाकर हॉस्पिटल प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : रत्नाकर हॉस्पिटल प्रकरणातील पाच डॉक्टर कर्मचाऱ्यांना जेरबंद करण्यास वाळूज पोलिसांना यश आले आहे. मात्र, नाव बदलून शहरात अनेक ठिकाणी रक्त तपासणीचा काळा बाजार करणाऱ्या ईएसआयएस हॉस्पिटलचे मेडिकल ऑफिसर कबाडे रजेवर गेले आहेत, तर,तोगरीकर फरार आहेत. 

दशकभरापूर्वी बंद झालेल्या शहरातील एका पॅथॉलॉजी लॅबचालकाची बनावट स्वाक्षरी करणे आणि रग्णांना खोटे रिपोर्टस् देऊन रुग्ण तसेच संबंधित लॅबचालकांची फसवणूक केल्याची घटना वाळूजला उघडकीस आली. अशा प्रकारे बनावट रिपोर्ट देऊन रुग्णाच्या जिवाशी खेळणाऱ्या वाळूजच्या डॉ. रत्नाकर हॉस्पिटलच्या चार डॉक्टर दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकारानंतर डीबी स्टारने पुढचा तपास सुरू केला असता धक्कादायक प्रकार समोर आला होता.
 
चार डॉक्टरांपैकी यातील पॅथॉलॉजिस्ट असलेल्या डॉक्टर एस. जी. तोगरीकर या नावाचा डॉक्टरच नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर चमूने याचा सखेाल तपास केला. त्यातून तोगरीकर हे ईएसआसएस हॉस्पिलमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले. आता पोलिस या डॉक्टरचा शोध घेत अाहेत. प्रत्यक्षात या डॉक्टरचे खरे नाव डॉ. जी. एस. कबाडे असे आहे. वृत प्रसिद्ध होताच कबाडे यांनी अधिकृतपणे सुटी टाकली आहे, तर तोगरीकर हे फरार आहेत. माणूस एकच, पण नावे बदलल्याने त्याबाबत असा सगळा गोंधळ आहे. आता पोलिसांसमोर हे सर्व काळजीपूर्वक उघड करणे हे आव्हान आहे. 
 
विशेष लक्ष आहे 
याप्रकरणात अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती आले आहेत. सहापैकी आम्ही आरेापींना अटक केली आहे. उर्वरित डॉ. तोगरीकर यांचा शोध सुरू आहे. लवकरच सर्व आरेापींना अटक केली जाईल.- शशिकांत तायडे, चौकशी अधिकारी, वाळूज ठाणे 
 
पाच जणांना अटक; एक डॉक्टर फरार 
वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवल्यानंतर यातील डॉ. डॅनियल कार्लेकर विनोद बन्सोडे यांना अटक करण्यात आली होती. यातील तिसरी डॉक्टर अलका बनसोडे यांना अटक करण्यात आली होती. उर्वरित डॉ. श्रद्धा वाघ, डॉ.एस.जी. तोगरीकर, डॉ.चित्रा बिवडे हे फरार होते. यातील डॉ. वाघ बिवडे यांना पोलिसांनी अटक केली असून पोलिसांनी रत्नाकर हॉस्पिटल प्रकरणात जणांना अटक केली आहे. मात्र नाव बदलून काळाबाजार करणारा एकच डॉक्टर डॉ. जी.एस. कबाडे हॉस्पिटमध्ये सुटी टाकून गायब झाला, तर दुसरे नाव असलेला डॉ. जी.एस. तोगरीकर पोलिसांच्या भीतीने फरार झाला आहे. 
 
हे ही वाचा,
बातम्या आणखी आहेत...