आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटीमुळे जगणे होईल सुसह्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील २७ शहरांत औरंगाबादचा समावेश झाल्याची घोषणा आज दिल्लीत झाली. चोहीकडे खड्डे, खराब रस्ते, कचऱ्याचे ढिगारे, बेलगाम वाहतूक, चार दिवसांनी येणारे पाणी अशा अवस्थेत राहणाऱ्या औरंगाबादकरांना निदान स्मार्ट सिटीमुळे जगणे सुसह्य होण्याची आशा निर्माण झाली आहे. स्मार्ट सिटीचे काम लवकरच सुरू होणार असून त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसपीव्हीची नोंदणीही मंगळवारी झाली आहे.
संपूर्णशहरासाठी घनकचरा व्यवस्थापन, स्मार्ट नागरी परिवहन यंत्रणा आणि ५०० एकरांत चिकलठाण्यात ग्रीनफिल्ड सिटी असे स्वरूप असणारा औरंगाबादचा १७३० कोटी रुपयांचा प्रस्ताव होता. केंद्रीय समितीने छाननी केल्यानंतर औरंगाबादच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आज दिल्लीत केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी या नावांची घोषणा केली.
मागील जून महिन्यापासून स्मार्ट सिटीच्या तयारीला लागलेल्या औरंगाबादला पहिल्या टप्प्यात यश आले नव्हते. औरंगाबादचा प्रस्ताव नाकारण्यात आल्यानंतर त्यात फेरबदल करत आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या नेतृत्वाखाली सुधारित आराखडा तयार करण्यात आला. शहराची ओळख असलेल्या पर्यटन क्षेत्रावर फोकस करत सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या जगण्यातील समस्या दूर करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन आणि स्मार्ट नागरी परिवहन यंत्रणा यांचा समावेश करण्यात आला. तसेच चिकलठाण्यात ५०० एकरांवर ग्रीन फिल्ड सिटी विकसित करण्याचाही या प्रस्तावात समावेश आहे.

आज शहराचा यादीत समावेश झाला असून लवकरच कामकाजाला प्रारंभ होणार असून साधारणपणे वर्षभरात या कामांना प्रारंभ झाल्याचे नागरिकांना पाहायला मिळणार आहे.

असाआहे ग्रीनफिल्ड प्रकल्प
महापालिकेच्याप्रस्तावात चिकलठाण्यातील ग्रीनफिल्ड सिटीबाबत सविस्तर नमूद करण्यात आले आहे. २३३ हेक्टरवर ‘दिव्य ज्योती’ ग्रीनफिल्ड सिटी उभारण्यात येणार आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाजवळ तसेच विमानतळाला जवळ असल्याचा फायदा या ग्रीन सिटीला मिळणार आहे. शेंद्रा औद्योगिक वसाहत डीएमआयसी जवळ असल्याने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. त्यातील ५० हेक्टर जमीन सरकारी आहे तर उरलेली खासगी आहे.

लवकरच सुरू होणार काम घनकचरा व्यवस्थापन
{ तंत्रज्ञानाच्या मदतीने घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा { कचरा संकलन वाहतुकीसाठी आधुनिक तंत्राचा वापर. कचरा कुंड्यांचे टॅगिंग, वजनाचे स्कॅनिंग करणारी यंत्रणा { कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देखरेख. त्यात सेन्सर्स, जीपीएस यंत्रणाा असेल. { नागरिकांच्या सुविधेसाठी मोबाइल अॅप { सफाई कर्मचाऱ्यांचे बायोमेट्रिक ट्रॅकिंग.
शहराची परिवहन यंत्रणा स्मार्ट नागरिक स्नेही करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
{ बस वाहतुकीची माहिती देणारे अॅप तयार करणे. त्यात बसेसचे मार्ग, वेळा, बसेसचे सध्याचे ठिकाण तिकीट आदी सेवा असतील.
{प्रवाशांची गरज ध्यानात घेऊन बससेवा सुरू करणे मार्ग आखणे
{सीसीटीव्ही आणि वेळा दर्शवणााऱ्या डिजिटल बोर्डांसह १०० स्मार्ट बस स्टाॅपची उभारणी
{बसेसवर जीपीएस यंत्रणा बसवणे
{वाहतूक व्यवस्थापन
{प्रवाशांच्या तक्रारी सोडवण्यासाठी व्यवस्था
{५५ हजार खांबांवर एलईडी दिवे
{२००० सीसीटीव्हीसह ७००० स्मार्ट पथदिवे, तसेच २०० डिजिटल साइनबोर्ड
{१५ हजार पथदिवे नागरी भागांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे
{या सर्व यंत्रणेचे एकाच जागेवरून नियंत्रण करता येणारी यंत्रणा.
६९२ अल्पउत्पन्न असणाऱ्यांसाठी घरे
१४४० आर्थिक दृष्ट्यामागासांसाठी घरे
१३६० मध्यमउत्पन्न गटासाठी घरे

{ सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट, व्यापारी संकुल, हाॅटेल्स
{ रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, पोलिस ठाणी, अग्निशमन केंद्रे
{ कौशल्य विकास केंद्रे, कन्व्हेन्शन सेंटर, थीम पार्क
{ सुनियोजित वसाहतीत असेल स्मार्टपार्किंग, वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा, स्मार्ट मीटरिंग
{ सव्वा ते दीड लाख झाडे
{ यातून मिळू शकतात २५००० रोजगार

स्मार्ट नागरी परिवहन यंत्रणा, काय असेल ग्रीन फिल्डमध्ये
राजकीय हस्तक्षेप : एसपीव्हीच्याकारभारात राजकीय हस्तक्षेप होणार नाही, याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.
अचूक नियोजन : अचूकनियोजन केले नाही तर योजना फसू शकते. याचा अनुभव शहराने घेतला आहे. त्याची पुनरावृत्ती टाळावी लागेल.
चिकलठाण्यातील भूसंपादन : ग्रीनफिल्डसाठी लागणारी जमीन शेतकऱ्यांकडून मिळवण्यासाठी लवकर प्रयत्न करावे लागतील.
अंमलबजावणी : एसपीव्हीचीस्वतंत्र यंत्रणा कितपत सक्षम आहे, याकडेही मनपा आयुक्तांना लक्ष द्यावे लागणार आहे.

ही असतील आव्हाने
निधीचा ओघ : केंद्रआणि राज्य सरकारकडून निधीचा ओघ कायम राहील, यासाठी पाठपुरावा करावा लागेल.
आज मनपाची सर्वसाधारण सभा होती. सभा सुरू असतानाच नंदकुमार घोडेले यांनी औरंगाबाद शहराची स्मार्ट सिटी योजनेत निवड झाल्याची माहिती सभागृहाला दिली. यावर सर्वच सदस्यांनी बाके वाजवून आनंद व्यक्त केला. घोडेले, भगवान घडामोडे, राज वानखेडे इतरांनी या निवडीबद्दल आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच स्मार्ट सिटीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
स्मार्ट सिटीचा प्रकल्प हाताळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एसपीव्ही अर्थात स्पेशल पर्पज व्हेइकलची आज नोंदणी झाली. याचाच अर्थ आता एसपीव्ही अस्तित्वात आली असून लवकरच तिचे काम सुरू होणार आहे. दिव्य मराठीशी बोलताना आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी स्मार्ट सिटीत शहराची निवड झाल्याबद्दल सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, अपूर्व चंद्रा चेअरमन आहेत, त्यांची उपलब्धता पाहून येत्या दोन आठवड्यांत एसपीव्हीची पहिली बैठक आयोजित करण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापन नागरी परिवहन यंत्रणा या दोन पॅनसिटी प्रकल्पांचा आराखडा तयार करण्याबाबतही लगेच निर्णय घेतले जाणार आहेत. बाकी कामकाज लवकरच सुरू होणार आहे.


मिळालेल्या संधीचे सोने करा, पाहिजे त्या मदतीसाठी आम्ही नेहमी तत्पर
औरंगाबाद -औरंगाबादशहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्याने मिळालेल्या संधीचे सोने करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. ही संधी डीएमआयसीच्या दृष्टीने उद्योजकीय विकासाची नांदी ठरेल. योग्य नियोजनासह उकृष्ट पायाभूत सुविधा दिल्या तरच शहर खऱ्या अर्थाने स्मार्ट होईल, अशा प्रतिक्रिया शहरातील उद्योजकांनी व्यक्त केल्या.
स्मार्ट सिटीच्या यादीत औरंगाबाद शहराचा समावेश झाल्याचे मेसेजेस व्हॉट्सअॅपद्वारे सर्वप्रथम उद्योजकांना माहीत झाले. सर्वांनीच मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांचे अभिनंदन केले. काही महत्त्वाच्या सूचना केल्या. लाँग टर्म प्लॅनिंगसह पैशाचे योग्य नियोजन महापालिकेडून अपेक्षित असल्याचे मत व्यक्त करत आम्ही पाहिजे ती मदत मनपाला करू, पण हे शहर सुधारू द्या, अशा भावना उद्योजकांच्या आहेत.


आर्थिक नियोजन शिकावे
सर्वप्रकल्प कागदावर सुंदर वाटतात. योजना प्रत्यक्षात अमलात येण्यासाठी कठोर परिश्रमांची गरज आहे. ९९ टक्के नव्हे तर शंभर टक्के प्रयत्नांची पराकाष्ठा करावी.

संधीचे सोने करा
मनपानेही विजयश्री खेचून आणली यात आयुक्त बकोरियांसह राजकीय पुढाऱ्यांचेही अभिनंदन करावे लागेल. या संधीचे आता सोने करूया असा संकल्प सर्वांनी करावा.

परिसर स्वच्छतेची जबाबदारी घेऊ
मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी पदभार स्वीकारल्यापासून रोज सकाळी ते रात्री १२ वाजेपर्यंत काम केले आहे, स्मार्ट सिटीच्या वॉर रूमच्या कल्पनेचे हे फलित आहे. सीआयआय संघटना मनपाच्या सदैव पाठीशी आहे. शहर विकासात पाहिजे ती मदत करायला आम्ही तत्पर आहोत.

मसिआ संघटनेच्या वतीने आम्ही उद्योग वसाहतीत ग्रीन अन् क्लीन अभियान राबवत आहोत. मनपाने हेच काम आम्हाला स्मार्ट सिटी करण्याच्या कामी दिले तर आनंदाने करू. आता शहरात उद्योग येतील. ते बाहेर जाणार नाहीत ही सर्वांची जबाबदारी आहे. शहर स्मार्ट झाले तर उद्योगाला मोठी चालना मिळेल.

आता ही योजना परिणामकारक पद्धतीने कशी राबवता येईल याचा विचार व्हावा. उद्योग आणि व्यापारी वर्गाकडून पाहिजे ती मदत आम्ही करू.
बातम्या आणखी आहेत...