आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धडक कारवाई : सोनोग्राफी केंद्रांची झाडाझडती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पालिका, महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने बुधवारी तिसर्‍या दिवशीही शहरातील सोनोग्राफी केंद्रांवर छापे मारले. मंगळवारी रात्री डॉ. मधुश्री तुपकरी यांच्या गारखेडा भागातील सोनोग्राफी केंद्राला सील ठोकण्यात आले होते. आज त्यांच्याच निराला बाजार येथील ओंकार केंद्रावर छापा मारला. मात्र, काहीही संशयास्पद आढळून आले नाही.
मनपाने आतापर्यंत तीन केंद्रांना सील ठोकले असून दोन केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. सील करण्यात आलेल्या केंद्रांविरुद्ध तातडीने खटले भरण्यात येणार असल्याचे प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयर्शी कुलकर्णी यांनी सांगितले.
गर्भपातानंतर अर्भकाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पालिकेवर असते. बायोमेडिकल वेस्टद्वारे ही प्रक्रिया करण्यात येते. सोनोग्राफी केंद्रांकडे झालेले गर्भपात आणि पालिकेच्या वतीने अर्भकांची लावण्यात आलेली विल्हेवाट याच्या आकडेवारीची जुळवाजुळव सुरू आहे. गर्भपातानंतर त्याची माहिती पालिकेकडे कळवण्यात येते. तसेच अर्भकांच्या विल्हेवाटीची नोंदही असते. मात्र, अद्याप ही आकडेवारी उपलब्ध नाही.’’ - डॉ. जयश्री कुलकर्णी
आतापर्यंत सील केलेली रुग्णालये
डॉ. विनायक खेडकर यांचे ज्योती हॉस्पिटल, सुराणानगर
डॉ. निर्मला कदम यांचे धन्वंतरी रुग्णालय, र्शीनिकेतन कॉलनी
डॉ. मधुर्शी सावजी यांचे सावजी-तुपकरी रुग्णालय, गारखेडा
परवाना रद्दे केलेली रुग्णालये - डॉ. मनीषा बेलसरे यांचे प्रभार्शी नर्सिंग होम, रोकडिया हनुमान कॉलनी आणि सचिन देशमुख यांचे देशमुख हॉस्पिटल.