आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐन दिवाळीत पूर्व विदर्भाकडून येणाऱ्या बस बंद, प्रवासी हैराण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ऐन दिवाळीत एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने विदर्भातून औरंगाबादकडे औरंगाबाद मार्गे फेऱ्या करण्याऱ्या चंद्रपूर -शिर्डी, अहेरी -शिर्डी, नागपूर -शिर्डी, औरंगाबाद - गडचिरोली या लांब पल्ल्यांच्या गाड्यांची सेवा रद्द केली आहे. त्यामुळे शहरात नोकरी व्यवसायानिमित्त राहणाऱ्या विदर्भातील नागरिकांना दिवाळीसारख्या सणाला या आपापल्या गावाकडे जाण्यात अडचणी येत आहेत. दुसरीकडे लांबचा पल्ला असल्याचे कारण पुढे करत महामंडळाच्या औरंगाबाद विभागानेही सेवा देण्यास नकार दिल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
पूर्व विदर्भातून चंद्रपूर -शिर्डी, अहेरी -शिर्डी, नागपूर -शिर्डी, औरंगाबाद-गडचिरोली या लांब पल्ल्याच्या बसेस येतात. ही सुविधा जवळपास २० ते २५ वर्षापासून सुरू आहे. याशिवाय औरंगाबाद मार्गे शिर्डी आणि शिर्डीकडून औरंगाबाद मार्गे विदर्भाकडे जाणाऱ्या या गाड्यांच्या फेऱ्याही सुरू असतात. नोकरीनिमित्त औरंगाबाद शहरात वास्तव्यास असणाऱ्या पूर्व विदर्भवासीयांना हा मोठा आधार होता. दिवाळीसह सर्व छोट्या-मोठ्या सणउत्सवासाठी आणि इतर प्रसंगी गावाकडे जाण्याची त्यांची सोय होत होती. शिवाय विदर्भात राहमाऱ्या औरंगाबाद परिसरातील लोकांनाही या सणांना इकडे येण्यासाठी या बससेवांचा फायदा होत होता. शिवाय पण मध्यवर्ती आणि सिडको अशा दोन्हीही बसस्थानकात या गाड्यांचे थांबे असल्याने अडचण येत नव्हती. मात्र यंदा दिवाळी सुरू होण्याआधीच म्हणजेच तीन आठवड्यांपूर्वी नागपूर विभागाकडून या बसफेऱ्या सेवा बंद करण्यात आल्या आहेत.

प्रवाशांच्या नशिबी टप्पा वाहतूक : औरंगाबादविभागामार्फत नागपूर, अमरावती, यवतमाळ, वाशीमपर्यंत सेवा पुरवली जाते. मात्र, यातही ऑनलाइन बुकिंगद्वारे गाड्यांची सीट बुक होत असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना अडचणीचे होते. तर दुसरीकडे चंद्रपूर, अहेरी आणि गडचिरोलीपर्यंत गाड्या रद्द करण्यात आल्याने पुढील प्रवासासाठी सामान आणि कुटुंबासह टप्पा पद्धतीने प्रवास करण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. त्यात सोबत वयोवृद्ध आईवडील अन्य नातेवाइक असतील तर त्यांना आणि सामानाचे जड ओझे घेऊन एवढा लांबचा प्रवास नकोसा वाटतो. त्यात आहे त्या गाड्यांची सेवाही अपुरी आणि प्रवाशांची संख्या अधिक असल्याने आणखी शीण येतो.

या प्रवाशांना फटका
अकोला,अमरावती, नागपूर, शेगाव, परतवाडा, चांदूरबाजार, कारंजा, वर्धा, साकोली, चंद्रपूर, अहेरी, मेहकर, वाशीम, रिसोड, दिग्रस, यवतमाळ, गडचिरोली, नागपूर, पांढरकवडा, पुसद, मंगरूळपीर आदी जिल्हा आणि तालुक्याच्या गावी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.

नागपूरला तक्रारी कराव्यात
यागाड्यांच्याफेऱ्या नागपूर डीव्हीजनमार्फत सुरू होत्या. औरंगाबाद विभागामार्फत क्षमतेनुसार नागपूर, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळपर्यंत सेवा सुरू आहे. मात्र पुढे गडचिरोली, चंद्रपूर आणि अहेरीपर्यंत लांबचा पल्ला असल्याने गाड्या खराब होतात. शिवाय वाहक चालकालाही थकवा येतो. विदर्भवासीय प्रवाशांनी नागपूर विभागाकडे तक्रारी केल्यास त्यांची दखल तिकडे घेतली जाईल.आमचाही सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. राजेंद्रपाटील, विभागनियंत्रक,औरंगाबाद विभाग

बातम्या आणखी आहेत...