आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिपिकाची दादागिरी सुरूच ; थेट आयुक्तांना फोन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अधिकार नसतानाही स्थायी समितीच्या सभापतींना पत्र लिहिणे तसेच बदलीनंतर पदभार सोडण्यास नकार देऊन उपायुक्तांनाच शिवीगाळ करणार्‍या मोतीलाल खरे या लिपिकाने थेट आयुक्तांनाच फोन करून सफाई पेश केली. त्यामुळे आयुक्तांनी लगेच त्याला निलंबित केले असून त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
अनुकंपा तत्त्वावरील कर्मचार्‍यांच्या नियुक्तीत गडबड केल्याचे प्रकरण स्थायी समितीसमोर आल्यानंतर अधिकार नसताना त्यांनी सभापतींना पत्र लिहिले होते. हा सभागृहाच्या शिस्तभंगाचा प्रकार असल्याचे समोर आल्यानंतरही अन्य कोणतीही शिक्षा न करता त्यांची बदली करण्याचे आदेश देण्यात आले. बदलीनंतरही त्याने आस्थापना विभाग सोडण्यास नकार दिला.
पंचनामा करण्यासाठी गेलेले आस्थापना अधिकारी सी. एम. अभंग यांना धक्काबुक्की केली आणि त्यानंतर उपायुक्त रवींद्र निकम यांनाही धक्काबुक्की केली. यानंतरही खरे यांनी पदभार सोडला नाही. मंगळवारी त्याने थेट आयुक्त डॉ. भापकर यांनाच फोन केला. आदेशानंतरही नव्या ठिकाणी रुजू न होणार्‍या लिपिकाची अशी दादागिरी सुरू असल्याचे समजताच खरे यांना तत्काळ निलंबित करण्यात आले. त्याचबरोबर शिस्तभंगाची कारवाई करून शक्य असल्यास बडतर्फीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले.