आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत कंगाल पालिकेची भरदिवसा \'दिवाळी\', आधी 5 दिवस अंधार, आता सूर्यप्रकाशातही पथदिवे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कंगाल पालिकेची शहरभरात ‘दिवाळी’. कायम निधी नसल्याची ओरड करणाऱ्या मनपाला याआधीही १०० कोटींची मालमत्ता गहाण ठेवण्याची पाळी आली होती. तरीही अधिकारी व संबंधित विभाग कुठलाही बोध न घेता अशी उधळपट्टी करत आहे. त्यामुळे आता दिवाळे काढणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आयुक्तांनीच सणसणीत ‘शॉक’ देण्याची वेळ आली आहे. 

सहा महिन्यांपूर्वी सर्वसाधारण सभा सुरू असताना मुख्य प्रशासकीय इमारतीची वीज गुल झाली होती. अगदी गेल्याच महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाचे वीज  कनेक्शन कापण्यात आले होते, तर अलीकडेच बिल थकवल्याचे कारण पुढे करत महावितरणने चार दिवस पथदिवे बंद केले होते.  

या परिसरात दिवसा दिवे
सातारा परिसरातील आमदार रोडसह सूर्यदीपनगर, यशोदीपनगर, पद्मावतीनगर, अभिषेक व्हॅली सोसायटी, आकाशदीपनगर, न्यू विद्यानगर, संग्रामनगर या सर्व भागात भरदिवसा दिवे सुरू होते. दुसरीकडे सिडको उड्डाणपुलावरील दिवेही सुरू ठेवण्याचा प्रकार सुुरू आहे.  हे कमी की काय या पुलाखालीही सर्व दिवे दिवसाढवळ्या सुरूच आहेत. याचबरोबर दशमेशनगर, श्रेयनगर, न्यू उस्मानपुरा, संत एकनाथ रंगमंदिर रोड, सिडको एन-२ ठाकरेनगर, जवाहर कॉलनीसह शहरभरातील अनेक वसाहतींत हीच स्थिती आहे, पण तक्रारी करूनही याकडे कुणीही गांभीर्याने पाहत नाही. 

यासंदर्भात मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, कार्यकारी अभियंता सय्यद सिंकदर अली तसेच विद्युत विभागाचे उपअभियंता के. डी. देशमुख यांच्याशी बोलण्याचा वारंवार प्रयत्न केला. पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.  परिणामी बाजू समजू शकली नाही.

पुढील स्लाइडवर वाचा जागोजागी रस्त्यांवर खांब पडून, कोट्यवधींची मालमत्ता वाऱ्यावर...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...