आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅप, व्हॉट्सअॅपवरही ‘एमपीएससी’ची तयारी, औरंगाबादच्या अभियंत्याचे अॅप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- स्पर्धेच्यायुगात माहितीअभावी ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नयेत म्हणून ग्रामीण भागातूनच आलेल्या अभियंत्याने खास अॅप बनवले आहे. त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यासक्रम, दैनंदिन सामान्य ज्ञानाची माहिती अँड्राॅइड अॅपवर उपलब्ध केली आहे. नीलेश रघुनाथ पाटील असे या बी. ई. इलेक्ट्रिकल अभियंत्याचे नाव असून तो मूळचा पिशोर (ता. कन्नड) येथील आहे. नीलेशने २० पेक्षा जास्त वेबसाइट अॅप इतरांसाठी डिझाइन केले.
त्यातच आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी त्याला विद्यार्थ्यांसाठी काहीतरी कर, असे सुचवले अन् त्याने स्पर्धा परीक्षेचा सर्व अभ्यासक्रम क्लिकवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.
व्हॉट्सअॅपवरही मार्गदर्शन
विद्यार्थ्यांना७०४०२५२३२५ या क्रमांकावर व्हॉट्सअॅपद्वारे माहितीची सुविधा दिली आहे. त्यावर कनेक्ट झाल्यास एमपीएससी अपडेट्स, कोणत्या विभागात किती जागा, त्याच्या तारखा, त्याचा संभाव्य अभ्यासक्रम, अर्ज कोठे कसा करावा, याचीही माहिती दिली जाते.

विद्यार्थ्यांनी ‘अॅप’चा फायदा घ्यावा
ग्रामीणभागातील विद्यार्थी प्रचंड गुणवत्ता असूनही फक्त वेळेत माहिती तसेच अभ्यासाची साधने मिळत नसल्याने मागे पडतात. त्यांनाही स्पर्धेत येता यावे यासाठी मी अॅप वेबसाइट विकसित केली आहे. -नीलेश पाटील, अॅप डिझाइनर

80 हजार युजर्स
या अॅपचे आजघडीला ८० हजार युजर्स आहेत, पैकी ६० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत.

असे आहे अॅप
mpscworld.comया गुगल प्ले स्टोअरच्या अॅपवर एमपीएससी अभ्यासक्रम नेमका कसा असतो, त्यातील वेळोवेळी होणारे बदल, उत्तरांची तयारी कशी करावी, याची माहिती आहे. काही प्रश्नपत्रिकाही यावर उपलब्ध आहेत. ऑनलाइन परीक्षा देण्याची सोय आहे. याच नावाची वेबसाइटही त्याने डिझाइन केली आहे.