औरंगाबाद - सकाळी प्रार्थनेची वेळ म्हणजे सर्वच शाळांमध्ये आनंद, उत्साहाचे वातावरण असते. मुले हसत-खेळतच प्रार्थनेसाठी धावत येत असतात. मात्र, बुधवारी (१७ डिसेंबर) वेगळेच चित्र होते. पाकिस्तानातील
आपल्याच वयाच्या मित्रांना अतिरेक्यांनी क्रूरपणे गोळ्या घालून ठार केले, ही भावनाच मुलांना हादरवून गेली होती. त्यांनी अतिशय व्यथित मनाने अतिरेकी हल्ल्यात मरण पावलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यासोबत भ्याड अतिरेक्यांचा धिक्कारही केला. शहरातील सुमारे ७५० शाळांमधील ५० हजार चिमुकल्यांचे आवाज धिक्कारासाठी उंचावले होते.
जगभरात शांतता नांदो
शाळांचीनियमित प्रार्थना होण्यापूर्वी शिक्षक, मुख्याध्यापकांनी पाकिस्तानात झालेल्या घटनेची माहिती दिली. दोन मिनिटे मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन केले. त्यानंतर अतिरेक्यांचा धिक्कार करणाऱ्या घोषणा देत जगभरात शांतता नांदो, अशी प्रार्थना करण्यात आली.
या शाळांमध्ये व्यक्त झाल्या संवेदना
गोदावरीपब्लिक स्कूल, आ. कृ. वाघमारे, शारदा मंिदर कन्या प्रशाला, सरस्वती भुवन विद्यालय, सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालय, सोनामाता विद्यालय, ज्ञानप्रकाश विद्यामंदिर गारखेडा, राजीव गांधी उर्दू प्राथमिक शाळा, डॉ. झाकीर हुसेन स्कूल, फोस्टर इंग्लिश स्कूल, झम झम उर्दू प्राथमिक शाळा, कोहिनूर उर्दू हायस्कूल, अब्दुल रहिम उर्दू स्कूल, मलिक अंबर स्कूल, केेंब्रिज, सेंट लॉरेन्स, नाथ व्हॅली यासह अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
त्यांना कठोर शिक्षा करा
-हीघटना पाहून मी हादरून गेलो. लहान मुलांचे प्राण घेणाऱ्या अतिरेक्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. शहाआवेस, फोस्टरइंग्लिश स्कूल
-जे पेशावरमध्ये घडले, ते भारतातही होऊ शकते. त्यामुळे सरकारने तातडीने शाळांची सुरक्षा वाढवावी. शेखफसी, फोस्टरइंग्लिश स्कूल
-जे झाले ते कधीही विसरता येणार नाही. या घटनेतून धडा घेऊन विद्यार्थ्यांनी अशा वेळी काय करायला हवे. आपला जीव कसा वाचवायचा, याचे प्रशिक्षण द्यावे. आमिरखान, फोस्टरइंिग्लश स्कूल