आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक मतदारसंघासाठी सहा फेब्रुवारी राेजी मतदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : औरंगाबाद शिक्षक मतदारसंघासह राज्यातील विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक अायाेगाने बुधवारी जाहीर केला. यात नागपूर, काेकण या दाेन शिक्षक मतदारसंघांचा तर अमरावती नाशिक या पदवीधर मतदारसंघाचा समावेश अाहे.
 
या पाचही जागांसाठी तीन फेब्रुवारी राेजी मतदान हाेणार अाहे, तर सहा फेब्रुवारी राेजी मतमाेजणी हाेऊन निकाल जाहीर हाेतील. दहा जानेवारी राेजी निवडणुकीची अधिसूचना निघेल.
उमेदवारी अर्ज १७ जानेवारीपर्यंत स्वीकारले जातील, १८ जानेवारी राेजी अर्जांची छाननी हाेईल, तर २० जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल.
 
फेब्रुवारी राेजी मतदान हाेईल फेब्रुवारी राेजी मतमाेजणी हाेऊन निकाल जाहीर केले जातील. मराठवाड्यातील अाठ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या अाैरंगाबाद शिक्षक मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे अाहे. विद्यमान अामदार विक्रम काळे यांचा कार्यकाळ डिसेंबर राेजी संपला अाहे. 
बातम्या आणखी आहेत...