आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

3 हजार शिक्षकांवर गुन्हा दाखल , शिक्षकांच्या मोर्चातील आंदोलकांनी पोलिसांवर केली होती दगडफेक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मंत्रिमंडळ बैठकीवरील शिक्षक मोर्चादरम्यान दगडफेक करून पोलिसांना जखमी करणाऱ्या ५९ शिक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. साबळे यांनी १२ आरोपी शिक्षकांना १० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. उर्वरित ४७ शिक्षकांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. कोठडीत डांबण्यात आलेल्यांमध्ये काँग्रेस शिक्षक आघाडी प्रदेशाध्यक्ष मनोज पाटील, वाल्मीक सुरासे यांचा समावेश आहे.
दरम्यान, सुमारे तीन हजार मोर्चेकऱ्यांविरुद्ध खुनाचा प्रयत्न करणे, दगडफेक, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीवर धडकलेल्या शिक्षकांच्या मोर्चाला हिंसक वळण लागले. मोर्चेकऱ्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. प्रत्युत्तरात त्यांनी दगडफेक केली. त्यात सुमारे १७ पोलिस कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी नागनाथ कोडे यांच्या तक्रारीवरून माेर्चातील ५९ शिक्षकांविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०७, ३५३, ३३३, ३३६, ३३७, १४३, १४७, १४८, १४९ आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान अॅक्ट १९८४ चे कलम क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट १९३२ चे कलम सह कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी ५९ माेर्चेकरी शिक्षकांना अटक करून आज बुधवारी (दि. ५) न्यायालयात हजर केले. सरकारी वकील शोभा विजयसेनानी यांनी शिक्षकांकडे लाठ्या-काठ्या कोठून आल्या, मंत्र्यांच्या महत्त्वाच्या फायली गायब करण्याचा किंवा मंत्र्यांना घातपात करण्याचा मोर्चातील शिक्षकांचा उद्देश होता का, याचा तपास करावयाचा असल्याने आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने मागणी मान्य करून शिक्षक संघटनेचे पदाधिकारी अशा १२ जणांना १० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
बातम्या आणखी आहेत...