आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस लाठीचार्जमुळे संतप्त झालेल्या शिक्षकांचा सवाल- तावडेसाहेब, आमचा दोष काय ?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षक आंदोलकांना थोपवताना पोलिस. - Divya Marathi
पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षक आंदोलकांना थोपवताना पोलिस.
औरंगाबाद - विना अनुदानित कृती समितीच्या ठिय्या आंदोलनादरम्यान काहींनी मंत्र्यांवर केलेली अश्लील शेरेबाजी व वाहतूक खोळंबल्यामुळे पोलिसांनी अश्रुधूराची नळकांडी फोडत लाठीमार केला. त्यात २ महिला शिक्षकांसह ३१ जण जखमी झाले. प्रत्युत्तरात शिक्षकांनी केलेल्या दगडफेकीत ९ पोलिस जखमी झाले.

२० टक्के अनुदान देऊन बोळवण केल्याच्या निषेधार्थ समितीने मोर्चा काढला होता. घोषणाबाजी व अश्लील शेरेबाजी करत मोर्चेकरी पैठण गेट, सिटी चौकमार्गे जामा मशीद चौकात आले. त्यांच्या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय ते टाऊन हॉलकडे येणाऱ्या मार्गावरील तसेच मनपा ते जिल्हाधिकारी कार्यालय, बुढीलेन ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्ग बंद झाले. वारंवार सूचना करूनही मोर्चेकरी हटण्यास तयार नव्हते. त्यामुळे पोलिस आयुक्त अमितेशकुमार चार वाजून दहा मिनिटांनी आंदोलनस्थळी पोहोचले आणि पोलिसांनी लाठीमार सुरू केला. आंदोलकांच्या दगडफेकीत सिटी चौकचे शेख गफ्फार, जयसिंगपूरचे अब्दुल खालेद, जालना येथील विशाल बोरसेंसह ९ जण जखमी झाले.

ते शिक्षक होते का?
दरम्यान, ‘दिव्य मराठी’ कार्यालयाला विनोद तावडे यांनी सदिच्छा भेट दिली. तेव्हा त्यांनी शिक्षकांच्या मोर्चात शिक्षक होते की कोण होते, असा सवाल केला. अश्लील शेरेबाजी करणे कितपत योग्य आहे? खऱ्या शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कधीही तयार आहे, असेही ते म्हणाले. २० टक्के अनुदानासाठीच्या काही अटी शिथिल करण्याबाबत विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, शिक्षकांचा सवाल- तावडेसाहेब, आमचा दोष काय ?
>आमदार चव्हाण, काळेंवर रोष व्यक्त
> जखमी शिक्षकांची नावे
> शिक्षकांची धरपकड
> घाटीत धावपळ
बातम्या आणखी आहेत...