आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: सैन्यात नोकरीचे अामिष दाखवणाऱ्यास कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद: सैन्यदलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून चार लाखांना गंडा घालणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्याला मेपर्यंत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी पोलिस कोठडी सुनावली. गणेश लक्ष्मण ऊर्फ यशवंत पलाटे ऊर्फ गव्हाणे (२२, रा. नायगाव हर्सूल, सावंगी) असे आरोपीचे नाव आहे. 
 
अहमदनगर येथील लक्ष्मी सुभाष दिवे यांनी तक्रार दिली की, लक्ष्मी दिवे त्यांचा भाचा २०१४ मध्ये टीव्ही सेंटर येथे पोलिस भरती पाहण्यासाठी गेले होते. त्या वेळी तेथे आरोपी गणेश पलाटे त्यांना भेटला. त्याने दिवे यांना मिलिटरीचा मोठा अधिकारी भासवत रमेश पैदी पांडे नाव असल्याचे सांगितले. दिवे यांचा पत्ता घेतला आणि लक्ष्मी यांचा पुतण्या महेश दिवे याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांची छावणी मिलिटरी कॅम्पबाहेर गणेश गव्हाणे याच्याशी भेट करून दिली. त्याने चार लाख रुपयांची मागणी केली. दिवे यांनी ही रक्कम दिली. नियुक्तिपत्र दिले. दिवे यांनी चौकशी केली असता ते बोगस निघाले. त्यामुळे त्यांनी छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मात्र कोणतीही कारवाई झाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. आरोपी सिडको पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असून त्याला पोलिसांनी हर्सूल कारागृहातून ताब्यात घेतले. त्याला आज न्यायालयात हजर केले असता सहायक सरकारी वकील योगेश तुपे यांनी युक्तिवाद करून आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती केली. 
बातम्या आणखी आहेत...