आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद - दोन मुलांसह विवाहिता बेपत्ता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
औरंगाबाद- आपल्या दोन मुलांना घेऊन २५ वर्षीय विवाहिता मुकुंदवाडी परिसरातून बेपत्ता झाली आहे. प्रियंका मीननाथ गिरम असे तिचे नाव असून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
 
एकनाथ राजाराम गिरम (५०, रा. राजीव गांधीनगर) यांनी तक्रार दिली. प्रियंकाचा पती हैदराबादला गेला आहे. मार्च रोजी मुलीला शाळेत सोडण्यासाठी बाहेर पडलेली प्रियंका परत आलीच नाही. उंची पाच फूट, गोरा रंग, सडपातळ बांधा, लाल गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली आहे.
 
तिच्यासोबत सात वर्षांची अदिती चार वर्षांचा मुलगा रुद्र आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च रोजी प्रियंकाला एका महिलेने काम देण्याचे आमिष दाखवून कॉल केला होता. याविषयी तिने आईला सांगितले होते. 
 
परंतु अशा कुठल्याच महिलेचे एेकू नको, असे आईने सांगितले होते. त्यानंतर मार्च रोजी ती मुलांसह बेपत्ता झाली. तपास हवालदार शेख हनीफ करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...