आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad To Renigunta Janata Express Running Today

रेणीगुंटा जनता एक्स्प्रेस आज धावणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दहा डब्यांची औरंगाबाद-रेणीगुंटा ही जनता एक्स्प्रेस (07234) गुरुवारी धावणार असून, तिरुपतीसाठी औरंगाबादहून 5 व 12 जुलै रोजी विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. तिरुपतीला जाण्यासाठी आरक्षणही उपलब्ध आहे.

औरंगाबाद-रेणीगुंटा या जनता एक्स्प्रेसमध्ये दहा सर्वसाधारण डबे आहेत. या गाडीचे आरक्षण काढण्याची आवश्यकता नाही. औरंगाबादहून गुरुवारी सायंकाळी 6.40 वाजता रेल्वे निघून दुसर्‍या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सायंकाळी 6.30 वाजता रेणीगुंटा येथे पोहोचेल. या गाडीला जालना, पूर्णा, नांदेड, मुखेड, बासर, निझामाबाद, कामारेड्डी, सिकंदराबाद, काझीपेठ, वरंगल, खम्मम, विजयवाडा, तेनाली, ओंगोल, नेल्लोर, गुंटूर, वेंकटगिरी व श्रीकलाहस्ती आदी थांबे आहेत. विशेष रेल्वे 5 व 12 जुलै रोजी सायंकाळी 6.40 वाजता औरंगाबादहून निघून दुसर्‍या दिवशी सायंकाळी 7 वाजता तिरुपतीला पोहोचेल. गाडी 6 व 13 जुलै रोजी रात्री 9.14 वाजता परतीच्या प्रवासाला निघून रविवारी रात्री 8.30 वाजता औरंगाबादला पोहोचेल. पंधरा डब्यांच्या गाडीत थर्ड एसी 1, स्लीपर 6, जनरल 6 व दोन लगेज कम ब्रेक व्हॅनचा समावेश आहे.