आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद ते मुंबई शिवशाही बस आजपासून धावणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दिवाळीतील प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन नवनवीन बससेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन प्रथमच औरंगाबाद आगारासाठी एक शिवशाही बस देण्यात आली आहे.
 
गुरुवारपासून (५ ऑक्टोबर) दररोज रात्री १० वाजता मध्यवर्ती बसस्थानकातून मुंबईसाठी शिवशाही बस सुटेल. नाशिक बसस्थानक एकमेव थांबा आहे. परतीच्या प्रवासात मुंबई सेंट्रल येथून रात्री १० वाजता औरंगाबादकरिता बस निघेल. नवीन शिवशाही बस संपूर्ण वातानुकूलित असून ४५ आसनक्षमता आहे. औरंगाबाद मुंबई प्रौढ ६११ रुपये, लहान मुलांकरिता ३११ रुपये, औरंगाबाद-नाशिक ३२१, १६६, नाशिक-मुंबई प्रौढ ३०१, मुले १५६ रुपये आहे, असे आवाहन विभाग नियंत्रक आर. एन. पाटील यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...