आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या शहर स्वच्छतेसाठी येतोय; तुम्ही सहभागी होणार ना?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्यटननगरी औरंगाबादेत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे शहराची प्रतिमा डागाळते. ही परिस्थिती बदलण्यासाठी थेट जपानचे आठ नागिरक महास्वच्छता अिभयानात सहभागी होणार आहेत. औरंगाबादचा भूमिपुत्र गेल्या दोन वर्षांपासून यासाठी पुढाकार घेत आहे. २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या अभियानात सहभागी होण्याची हाक त्यांनी िदली आहे. गेल्या वर्षी ३५० टन घनकचऱ्याची विल्हेवाट लावली होती.


शहराची परिस्थिती बदलण्यासाठी जपानमध्ये स्थायिक झालेला औरंगाबादचा एक भूमिपुत्र शहराच्या महास्वच्छतेचे अभियान घेऊन परत आला आहे. गेल्या दोन वर्षांत शहरात स्वच्छता अभियान राबवून हजारो टन कचरा गोळा केल्यानंतर आपल्या ८ जपानी सहकाऱ्यांसह या अभियानाच्या तिसऱ्या पर्वासाठी तो सज्ज झाला आहे. २५ आॅगस्ट रोजी राबवल्या जाणाऱ्या या अभियानात शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संघटना, मित्रमंडळे आदींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे आवाहन त्याने केले आहे.

पहिले अभियान आई महोत्सव
भारत-जपान मैत्री महोत्सवाचा एक भाग म्हणून २६ आॅगस्ट २०१२ रोजी पहिले औरंगाबाद शहर महास्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले. जपानच्या ओसोजी या अभियानाची प्रेरणा घेऊन ही मोहीम राबवण्यात आली होती. जपानमध्ये आसोजीची ३०० वर्षांची परंपरा आहे. या अभियानात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने किमान २० मीटरचा परिसर स्वच्छ करणे अपेक्षित आहे. पहिले अभियान आई नावाने घेण्यात आले. यात महानगरपालिका सहभागी झाली होती. अनेक शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संघटनांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला. परिणामी महापौरांनी दरवर्षी २५ आॅगस्ट रोजी शहरात महास्वच्छता अभियान राबवण्याची घोषणा केली.

दुसऱ्या मोहिमेला दणदणीत यश
पहिल्या अभियानात चांगले यश मिळाले. त्यापासून प्रेरणा घेत २५ आॅगस्ट २०१३ च्या दुसऱ्या अभियानासाठी पुन्हा एकदा चैतन्य आणि त्यांचे ३ जपानी सहकारी ११ दिवस आधी शहरात दाखल झाले. या वेळी अधिकाधिक लोकांचा प्रतिसाद मिळवण्यासाठी त्यांनी शहराचे ६ प्रभाग पालथे घातले. १२ शाळांना अभियानाचे महत्त्व समजावून सांगितले. १८ ठिकाणी भाषणे दिली. यास शहरवासीयांनी दणदणीत प्रतिसाद दिला.

अवघ्या तासाभरात शहराच्या विविध भागांत राबवण्यात आलेल्या अभियानातून ३५० टन कचरा जमा झाला. महानगरपालिकेच्या ११० ट्रकांमधून तो डंपिंग ग्राउंडवर नेण्यात आला. ८० हून अधिक शाळा, हजारो नागरिक, विविध एनजीओ आदी यात सहभागी झाले होते.

सहभागी गटाला प्रशस्तिपत्र :
दुसऱ्या स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्यांना जपानमधील एका प्रसिद्ध मंदिराच्या गुरूंनी स्वच्छतेचा संदेश असणारे भेटकार्ड आणि टॉवेल पाठवले होते. यंदा ही परंपरा कायम ठेवतानाच सहभागी गटांना जपान सरकारच्या वतीने पाठवण्यात आलेले प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहेत.

हे समूह येणार : या स्वच्छता अभियानासाठी जपानमध्ये स्वच्छता अभियानाचा दांडगा अनुभव असणाऱ्या दोन संघटना येणार आहेत. १) शिनसेनगुमी म्हणजेच न्यू सिटी क्लीनिंग ग्रुप. सहा वर्षांपूर्वी या संघटनेची स्थापना झाली. याचे सक्रिय ३० ते ३५ सदस्य असून जपानच्या विविध २० शहरांत यांच्या शाखा आहेत. दर शनिवारी सकाळी ६ वाजता सर्व सदस्य एकत्र जमून एक तास तो परिसर स्वच्छ करतात. गोळा केलेल्या कचऱ्याचा हिशेब ठेवतात. हा समूह सध्या त्यांच्या या विधायक कामाचा ३०० वा आठवडा साजरा करत आहे. २) निप्पोन वो उत्सुकुशिकुसुरू काय २० वर्षांपूर्वी काझियामा हिडेसाबुरो सेनसाई यांनी 35 कॉम्रेड सहकाऱ्यांसह ही संघटना सुरू केली. सध्या जपानमध्ये १११ ठिकाणी यांच्या शाखा आहेत. तैवान, चीन, न्यूयॉर्क आणि ब्राझीलमध्येही याचा विस्तार झालाय. दर महिन्यात एका शाळेत सर्व सदस्य गोळा होातात व तिथले टॉयलेट्स स्वच्छ करतात. याचा उद्देश मुलांना टॉयलेट स्वच्छ करणे शिकवणे हे नसून स्वच्छतेचे काय महत्त्व आहे हे त्यांना पटवणे हा आहे. शहराचे महापौर या मोहिमेत गेल्या १८ वर्षांपासून सहभागी होऊन स्वत: टॉयलेट स्वच्छ करतात.

अवघ्या तासाभरात शहराच्या विविध भागांत राबवण्यात आलेल्या अभियानातून 350 टन कचरा जमा झाला. महानगरपालिकेच्या 110 ट्रकांमधून तो डपिंग ग्राऊंडवर नेण्यात आला. 80 हुन अधिक शाळा, हजारो नागरीक, विविध एनजीओ आदी यात सहभागी झाले होते.

- सहभागी गटाला प्रशस्तीपत्र
दुसऱ्या स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्यांना जपानमधील एका प्रसिद्ध मंदिराच्या गुरूंनी स्वच्छतेचा संदेश असणारे भेटकार्ड आणि टॉवेल पाठवले होते. यंदा ही परंपरा कायम ठेवतानाच सहभागी गटांना जपान सरकारच्यावतीने पाठवण्यात आलेले प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहेत.
हे समूह येणार
हे समूह येणार या स्वच्छता अभियानासाठी जापानमध्ये स्वच्छता अभियानाचा दांडगा अनुभव असणारे दोन संघटना येणार आहेत. 1-शिनसेनगुमी म्हणजेच न्यू सिटी क्लिनींग ग्रूप. सहा वर्षांपूर्वी या संघटनेची स्थापना झाली. याचे सक्रिय 30 तं 35 सदस्य असून जापानच्या विवीध 20 शहरात याच्या शाखा आहेत. दर शनिवारी सकाळी 6 वाजता सर्व सदस्य एकत्र जमून एक तास तो परिसर स्वच्छ करतात. गोळा केलेल्या कचºयाचा हिशेब ठेवतात. हा समूह सद्या त्यांच्या या विधायक कामाचा 300 वा आठवडा साजरा करत आहे. 2- निप्पोन वो उत्सुकूशिकू सुरू काय 20 वर्षापूर्वी काझियामा हिडेसाबुरो सेनसाई यांनी 35 कॉमे्रड सहकाºयांसह ही संघटना सुरू केली. सद्या जापानमध्ये 111 ठिकाणी याच्या शाखा आहेत. तैवान, चीन, न्यूयॉर्क आणि ब्राझीलमध्येही याचा विस्तार झालाय. दर महिन्यात एका शाळेत सर्व सदस्य गोळा होातात व तिथले टॉयलेट्स स्वच्छ करतात. याचा उद्देश मुलांना टॉयलेट स्वच्छ करणे शिकवणे हे नसून स्वच्छतेचे काय महत्व आहे हे त्यांना पटवणे हे आहे. शहराचे महापौर या मोहिमेत गेल्या 18 वर्षापासून सहभागी होऊन स्वत: टॉयलेट स्वच्छ करतात.
तिसरे अभियान
दोन्ही अभियानांमुळे चैतन्य आणि त्याच्या जपानी सहकाऱ्यांचा उत्साह वाढला आहे. यामुळे त्यांनी तिसऱ्या अभियानाची जोरात तयारी सुरू केली आहे. यात पालिकेचा सहभाग असेलच, पण स्वंयसेवी संघटना, मित्रमंडळ, महिला मंडळ, शाळा, महाविद्यालये, विविध संघटना यांनीही मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन चैतन्यने केले आहे. दिनांक- २५ आॅगस्ट २०१४, वेळ- सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत. ठिकाण-आपल्या नजीकचा २० मीटर परिसर. संपर्क- चैतन्य भंडारे- ८४४६३९१६३५, सी. जी. आगलावे- ९४२२२१०४२६, गिरीश मगरे- ९३२६२०९५१६ (फक्त मेसेज करा. आपणास स्वत: संपर्क केला जाईल.)
ई-मेल- abadcmc@yahoo.com
मराठवाड्याचा भूमिपुत्र

औरंगाबाद शहरात महास्वच्छता अभियान राबवण्याचे संपूर्ण श्रेय जाते मराठवाड्याचा भूमिपुत्र चैतन्य भंडारेला जाते. नांदेड जिल्ह्यातील हुतात्मा पानसरे विद्यालयात त्याने शालेय शिक्षण पूर्ण केले, तर नांदेडच्या यशवंत महाविद्यालय आणि मिलिंद महाविद्यालयातून त्याने बारावी व बीएस्सी पूर्ण केले. नंतर भोपाळ येथे एमएस्सी केले. गोव्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ ओशियनोग्राफीमध्ये त्याने संशोधन केले. २००६ मध्ये त्यास जपान सरकारने उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली. जपानच्या क्योटो विद्यापीठात त्याने पीएचडी केली. सध्या तो मायझरू येथील नॅशनल कॉलेज आॅफ टेक्नॉलॉजी येथे लेक्चरर म्हणून कार्यरत आहे.
मोठ्या संख्येने सहभागी व्हा
एक तास द्या, शहर स्वच्छ करा. औरंगाबाद हे आपले शहर आहे. हे शहर कचरामुक्त करणे पािलकेएवढीच आपलीही जबाबदारी आहे. म्हणून औरंगाबाद शहर महास्वच्छता अभियानात तुमचा सहभाग आवश्यक आहे. आपण आपल्या शेड्युलमधून फक्त एक तास जरी दिला, तरी आपण आपले शहर स्वच्छ, कचरामुक्त करू शकू. यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा.
- चैतन्य भंडारे, कन्वेनर, औरंगाबाद शहर महास्वच्छता अभियान