आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातील विष प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात विष प्राशन केलेल्या दीपक कचरू खरात या तरुणाचा मंगळवारी घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याने दोन पानी सुसाइड नोट लिहून ठेवली असून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या खोलीच्या भिंतीवरही मजकूर लिहून ठेवला आहे. शनिवारी एकतर्फी प्रेमातूनच त्याने विष घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातील कर्मचारी शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास वर्गात सफाई करताना त्यांना एक तरुण जमिनीवर पडलेला दिसला. तो नाटकाचा सराव करतोय असे कर्मचाऱ्याला वाटले. मात्र, त्यांच्या तोंडाला फेस आलेला दिसला. ही माहिती प्रा. जयंत शेवतेकर यांना मिळताच ते घटनास्थळी आले. विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्याला घाटीत दाखल केले. मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. तो नाट्यशास्त्र विभागात संगीताचे शिक्षण घेत होता. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास हेड कॉन्स्टेबल भगवान पटाईत करीत आहेत.
सुसाइड नोटमध्ये विभागप्रमुखांचे नाव
तीन महिन्यांपूर्वी दीपकच्या विरोधात विभागातील मुलीला अश्लील मेसेज केल्याप्रकरणी मुलीच्या नातेवाइकांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी विद्यार्थी असल्याने दीपकला समज दिली होती. त्यानंतर नाट्यशास्त्र विभागाने त्याच्यावर कारवाई करत त्याचा प्रवेश रद्द केला होता. तीन महिन्यांपूर्वी कोणालाही त्रास दिला नाही. झालेल्या प्रकाराशी माझे काहीही देणे- घेणे नाही, असे त्याने भिंतीवर लिहून ठेवत कीटकनाशक प्राशन केले होते. त्याने सुसाइड नोट लिहून ठेवली असून, त्यात नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचाही उल्लेख आहे, असे पोलिसांनी सांगितले.