आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूर-औरंगाबाद रस्ता बनला मृत्यूचा सापळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे वैजापूर-औरंगाबाद रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने हा रस्ता वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे.
वर्षभरात या रस्त्यावर जरूळ फाटा शिवारात एकूण घडलेल्या 12 अपघातांत आठ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे आता तरी सार्वजनिक बांधकाम उपविभाग हा रस्ता दुरुस्तीसाठी पुढाकार घेईल का, अशी वाहनधारकांसह नागरिकांतून मागणी होत आहे.
वैजापूर, खंडाळा, शिऊरमार्गे औरंगाबाद महामार्गावर शहरातील करुणानिकेतन शाळा ते खंडाळा गावापर्यंत जवळपास 15 कि.मी. लांबीच्या रस्त्याला दुतर्फा बाजूने मोठे खड्डे पडले आहेत. अगोदरच वाहतुकीसाठी रस्ता अरुंद असल्याने रस्त्यांचे साइड पंखे असलेल्या बाजूने खोलगट कपारी आहेत. यामुळे रस्त्यावरून वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते. समोरासमोर मोठी वाहने असल्यास वाहन रस्त्याच्या खाली उतरवण्याच्या प्रयत्नात खोलगट कपारीमुळे वाहने उलटण्याचे प्रमाण अधिक आहे. वर्षभरात या रस्त्यावर 12 अपघात घडले असून त्यात आठ जण मृत्युमुखी पडले आहेत, तर 30 ते 40 जण जखमी झाले आहेत. विशेषत: रात्रीच्या वेळी बाजूच्या कपारीचा अंदाज वाहनचालकांना येत नसल्यामुळे वाहने उलटतात.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष- या रस्त्यावर रोटेगाव रेल्वेस्टेशनच्या उड्डाणपुलाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आहे. रस्ता उंच आणि साइड पंखे धोकादायकरीत्या खोलगट झाला आहे. मात्र, या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या कडे डोळेझाक करत आहेत. तरी याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

आचारसंहिता संपल्यानंतर बघू
पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर या कामावर लक्ष घालू. के. आर. गाडेकर, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग