आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेदांतनगरात 20 फुटांवर पाण्याचे झरे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरातील काही भागांमध्ये 200 फूट खोल जाऊन पाण्याचा एक थेंब लागत नसताना रेल्वेस्टेशनमागील वेदांतनगर भागात मात्र अवघ्या 20 फुटांवर पाण्याचे झरे लागले आहेत. बालभारती कार्यालयासमोर थ्री स्टार हॉटेलसाठी दोन मजली अंडरग्राउंड पार्किंग करण्यासाठी हा 30 फुटांचा खड्डा खोदताना हे पाणी लागले. काम सुरू असलेले हॉटेल खासदार चंद्रकांत खैरे यांचे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. खैरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे एम. बी. पाटील यांनी बांधकामाचे कंत्राट घेतले आहे. मात्र खैरे यांनी हे हॉटेल माझे नाही, असे स्पष्ट केले आहे.
शहरात दिवसेंदिवस पार्किंगची समस्या वाढत असल्यामुळे पुण्या-मुंबईसारखी अंडरग्राऊंड दुमजली पार्किंग करण्यासाठी हा खड्डा करण्यात आला आहे. सुमारे 14 हजार स्क्वेअर फुटांच्या या प्लॉटमध्ये पाण्याचे झरेच झरे लागले आहेत. या झर्‍यांचा अगदी खळखळ आवाज येतो. ऐन उन्हाळ्यातदेखील या झर्‍यांना चांगले पाणी होते. कंत्राटदाराने या खड्डय़ातील पाणी उन्हाळ्यात आपल्या विविध साइटवर बांधकामासाठी वापरले.
<ऊ्र58ं टं1ं3ँ्र>बारवेसारखे रूप
<ऊ्र58ं टं1ं3ँ्र>पार्किंगसाठी करण्यात आलेल्या या खड्डय़ाला पुरातन बारवेसारखे रूप आले आहे. चारही बाजूंनी वाहणारे झरे आणि त्यातून झिरपणारे पाणी यामुळे जमिनीपासून पाच फुटांपर्यंत पाणी जमा झाले आहे. रोज तीन मोटारी लावून हे पाणी उपसले जाते. मात्र, पाण्याचा प्रवाहच एवढा जास्त आहे की त्यात पाणी येतच राहते. हे पाणी प्रयोगशाळेत तपासून वापरण्यायोग्य आहे का, हे तपासल्यास त्याचा वापर होऊ शकतो, असे मतही स्थानिकांनी व्यक्त केले आहे.
<ऊ्र58ं टं1ं3ँ्र>शहरातील पाण्याचा भाग
<ऊ्र58ं टं1ं3ँ्र>रेल्वेस्टेशन परिसरात पाणी असल्याचे यावरून जाणवते. ऐन उन्हाळ्यात रेल्वेस्टेशन परिसरात विहीर खोदण्यात आली. त्याला अवघ्या 30 फुटांवर पाणी लागले होते. या कामातही हा अनुभव आला आहे. काम सुरू असलेल्या भागात जवळच विहीर होती. ती बुजली आणि त्याचे पाणी या ठिकाणी आले असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

पावसाचे पाणी

साहेबांच्या हॉटेलचे काम सुरू आहे. अंडरग्राउंड दोनमजली पार्किंग करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 33 फूट खोल खड्डा करण्यात आला आहे. त्यात चार फूट फाउंडेशन वर्कसाठीच जाईल. हे पाण्याचे झरे नसून पावसाचे पाणी साठले आहे. त्यामुळे आम्हाला काम थांबवावे लागले आहे. - एम.बी पाटील, कंत्राटदार

संपूर्ण शहर माझे आहे

हॉटेलचे काम माझे नाही. संपूर्ण औरंगाबादच माझे आहे आणि स्वत:च्या मालकीचे म्हणत असाल तर केवळ मछली खडकवरील तेवढे माझे घर आहे. लोक मी दिलेला गणपतीचा फोटो किराणा दुकानात, हॉटेलमध्ये लावतात आणि सांगतात, हे खैरे साहेबांचे आहे. म्हणून ते माझे होत नाही. - चंद्रकांत खैरे, खासदार