आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाच हजारांत केले वॉटर हार्वेस्टिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पाणी वाचवणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. दैनिक ‘दिव्य मराठी’ने जनजागृती केल्यानंतर काही सुज्ञ लोकांनी पुढाकार घेतला आहे, तर काही संवेदनशील लोक आधीपासूनच पाणी वाचवण्यासाठी लहान-मोठे प्रयत्न करत आहेत. खारीचा वाटा उचलणार्‍या शहरवासीयांचे प्रयत्न त्यांच्याच शब्दांत..

आम्ही श्रेयनगरातील आमच्या घरात सात वर्षांपासून रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे पाण्याची बचत करत आहोत. असा प्रयोग प्रत्येकाने केल्यास या शहरात पाण्याची टंचाई कधीच भासणार नाही याची खात्री वाटते. केवळ पाच हजार रुपयांत आमची ही पाणीबचतीची योजना तयार झाली. टेरेसवर पडणारा पावसाचा थेंबन् थेंब पाइपच्या साहाय्याने 5 फूट खड्डय़ात सोडला आहे. जमिनीखाली पाच प्रकारचे थर तयार केले आहेत. सर्वात खाली विटांचे तुकडे, दुसर्‍या थरात खडी, तिसर्‍यात वाळू, चौथा थर परत विटांचा किंवा शक्य असल्यास कोळशे टाकूनही व्यवस्था करता येते. यावर 400 मायक्रॉनचे प्लास्टिक अंथरले आहे, तर सर्वात शेवटी गज टाकून ते झाकले आहे. आम्ही हे पाणी बोअरच्या अगदी जवळ सोडले आहे. यामुळे उन्हाळ्यातही बोअरला पाणी राहते.

प्रत्येक थेंबाचे मूल्य ओळखा
पत्नी दक्षाने मला या कामाची प्रेरणा दिली. तिने आग्रह केल्यामुळेच आम्ही पावसाचे हजारो लिटर पाणी जमिनीला परत देतो. आमच्या कॉलनीतही प्रत्येकाने हे करावे म्हणून प्रयत्न करणार आहे. लवकरच बाथरूमच्या पाण्याचेही शुद्धीकरण करून ते जमिनीत सोडण्याची आमची योजना आहे. पाण्याला सलाइनचे स्वरूप येऊ नये. पाणीबचतीला सर्वांनीच प्राधान्य द्यायला हवे. त्यासाठी मी मार्गदर्शन करायलाही तयार आहे. पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
स्वप्निल सराफ, मो. 9422207005