आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकारी महापौरांना म्हणाले, पाणीपुरवठा सुरळीतच आहे!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पाणीपुरवठ्यावर विशेष सभा बोलावण्याची सदस्यांची मागणी फेटाळत महापौर भगवान घडामोडे यांनी सोमवारी आपल्या दालनात सर्वपक्षीय गटनेत्यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तेव्हा उन्हाळ्यात पाणीपुरवठा सुरळीत करा, अशी सूचना महापौरांनी केली. तेव्हा आधीपासूनच पाणीपुरवठा सुरळीत असल्याचा दावा कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी केला. तेव्हा सभागृह नेते गजानन मनगटे संतप्त झाले अन् दोघांत जोरदार खडाजंगी झाली. वाद विकोपाला जाऊ नये याची खबरदारी घेत महापौरांनी रात्रीतून जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरून घ्या अन् पहाटे नंतर पूर्ण दाबाने पाणी द्या, असे आदेश दिले. 

जलवाहिनी फुटली, विद्युत पुर‌वठा खंडित झाला तरच पाणीपुरवठा विस्कळीत होतो, असा दावा अधिकाऱ्यांनी केला. बैठकीत मिळालेल्या सूचनांचे पालनही करू, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या बैठकीस स्थायी समितीचे सभापती मोहन मेघावाले, विरोधी पक्षनेते अय्युब जहागीरदार, शहर विकास आघाडीचे गटनेते गजानन बारवाल, सभागृह नेते गजानन मनगटे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

अशा मिळाल्या सूचना...
क्रॉसकनेक्शनची तपासणी करण्यात यावी, गळतीच्या ठिकाणी व्हॉल्व्ह बसवा, एन-५ येथील पाण्याच्या टाकीजवळील दोन फीडरपैकी एक फीडर २४ तास सुरू राहण्यासाठी वीज कंपनीची मदत घ्यावी, ब्रिजवाडी येथील पाण्याच्या टाकीला गळती आहे, त्याची तपासणी करून निर्णय घ्यावा अशा सूचनाही देण्यात आल्या. 

कोणती वेळ पाळावी? 
रात्री१२ ते पहाटे या वेळेत पुरवठा बंद ठेवून जलकुंभ भरून घ्यावेत, असे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी अधिकाऱ्यांना सांगितले होते. आजच्या बैठकीत रात्री ११ ते या वेळेत पाणीपुरवठा बंद ठेवून टाक्या भरून घ्याव्यात अन् चारनंतर पाणी सोडण्यास सुरुवात करावी, अशी सूचना देण्यात आली. त्यामुळे नेमकी कोणती वेळ पाळावी, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. 
बातम्या आणखी आहेत...