आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१३५ कोटी देण्यासाठी शासनाची अनुकूलता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहराच्या पाणीपुरवठ्यासह जायकवाडी ते फारोळ्यापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याची जबाबदारी महानगरपालिकेवर आली आहे. यासाठी ४६३ कोटी रुपयांची गरज असून, मनपाकडे ३२८ कोटी रुपये आहेत. उर्वरित निधी देण्यासह काम करण्याची परवानगीविषयी दोन दिवसांपूर्वी मुंबईत सकारात्मक बैठक झाल्याची माहिती आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी दिली.
जास्तीचा निधी राज्यसरकारकडून मिळावा, तसेच मनपाने दुसऱ्या ठेकेदाराकडून काम करून घेण्याची परनगी मिळण्यासाठी नगरविकास सचिव मनिषा म्हैसकर, मनपा आयुक्त् बकोरिया, पाणीपुरवठा अभियंता सरताजसिंग चहल यांची बैठक शुक्रवारी मुंबईत पार पडली. यात बकोरिया यांनी मनपाची स्थिती, न्यायालयीन स्थिती यासह निधीची माहिती दिली. तसेच निधी मिळाल्यास मनपाकडूनच सर्व काम होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यावर म्हैसकर यांनी सकारात्मक दृष्टीने काम होणार असल्याचे संकेत दिले. तसेच योजनेसाठी आवश्यक असलेले १३५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यास सरकार अनुकूल असल्याचे बकोरिया यांनी सांगितले. यासाठी महापालिकेच्या वतीने शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून, हा निधी मिळाल्यास जलवाहिनीचे काम पूर्णत्वाकडे जाईल , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...