आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने मागितली 500 कोटींची नुकसान भरपाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहराला पाणीपुरवठा करण्यासह समांतरचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने जे. टी. नाशिककर लवादापुढे आपला दावा दाखल केला. यात मनपाची टर्मिनेशनची नोटीस रद्द करा, समांतरचे काम करण्याची परवानगी द्या आणि हे शक्य नसेल तर कंपनीला ५०० पेक्षा अधिक कोटीची नुकसान भरपाई द्या, अशी विनंती केली आहे. 

कंपनीचे विधी सल्लागार नितीन वांगीकर यांनी दावा सादर केला. १०८३ पानांच्या या दाव्यात पुराव्यांचे खंड आहेत. दाव्यात म्हटले आहे की, महापालिकेने समांतर जलवाहिनीसाठी कंपनीसोबत केलेला करार बेकायदेशीर पद्धतीने मोडला आहे. त्यामुळे मनपाने कंपनीला बजावलेली टर्मिनेशनची नोटीस रद्द करा, तसेच करार पूर्ववत सुरू ठेवा. सोमवारी या दाव्याच्या प्रती कंपनी मनपाला देणार आहे. त्यानंतर एका महिन्यात मनपाने दाव्याचे उत्तर द्यायचे आहे. दाव्याचे उत्तर देताना मनपा आपले म्हणणे मांडू शकते शिवाय कंपनीविरुद्ध काउंटर क्लेमही करू शकते. दाव्याची सर्व कागदपत्रे दाखल झाल्यानंतर कोणत्या मुद्यावर दावा चालवायचा त्याचे मुद्दे निश्चित केले जातील.
 
मनपाचे विधी सल्लागार अपर्णा थेटे यांनी दावा दाखल झाल्याचा दुजोरा दिला. कंपनीचा दावा प्राप्त झाल्यानंतर त्यावर अभ्यास करून मनपा आपले उत्तर सादर करणार आहे. लवादाचे अध्यक्ष जे. टी. नाशिककर असून कंपनीकडून सिडकोचे निवृत्त मुख्य अभियंता पी. एस. अंबिके तर मनपाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव एस. आर. तांबे यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...