आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद होईल गुलाब उद्योगाचे जागतिक केंद्र, पद्मविभूषण शास्त्रज्ञ एम.एम. शर्मा यांचे मत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबादला पाणीटंचाई आहे, हे मी ऐकले आहे. त्यावर एक चांगला पर्याय आहे तो म्हणजे येथे गुलाब शेती हवामानाच्या दृष्टीने अत्यंत योग्य असून ठिबक सिंचनाचा उपयोग करून येथे जागतिक दर्जाचा गुलाब उद्योग बहरू शकतो, असा नवा विचार ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.एम.एम.शर्मा यांनी दिव्य मराठीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.
 
डॉ. शर्मा शनिवारी यशवंत व्याख्यानमालेत तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी औरंगाबादेत आले आहेत. त्यांनी ‘दिव्य मराठी’शी खास औरंगाबादच्या आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक परिस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले की, औरंगाबाद हे एेतिहासिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे. पण येथे पाणीटंचाई आहे, असाही प्रचार होतो. ती ओळख औरंगाबादकरांनी खोडून काढली पाहिजे. शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत थोडा बदल करून या भागातील भौगोलिक परिस्थिशी अनुरूप शेती केली तर येथील शेतमालाचा उद्योग जागतिक स्तरावर जाऊ शकतो. गुजरातच्या कच्छमधील वाळवंटात वॉटर हार्वेस्टिंग करून खजूर तयार होऊ शकतो. टिश्यू कल्चर होऊ शकते तर मराठवाड्यात ते का शक्य नाही? नगर डाळिंब उत्पादनात अग्रेसर आहे. अवघा महाराष्ट्र त्यामुळे डाळिंब निर्यातीसाठी ओळखला जातो. मग औरंगाबादला शेती उद्योग का बहरू शकत नाही.
 
आज नवोन्मेष या विषयावर व्याख्यान
ज्येष्ठ उद्योजक यशवंत गर्दे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित यशवंत व्याख्यानमालेत डॉ.शर्मा शनिवारी दुपारी ४.३० वाजता नवोन्मेष (इनोव्हेशन) या विषयावर तापडिया नाट्य मंदिरात तरुणांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती आस्था फाउंडेशन सीएमआयएचे माजी अध्यक्ष आशिष गर्दे यांनी दिली.
 
रोजगार उन्नतीसाठी शेती आणि पॉलिमर उद्योग करा...
डॉ.शर्मा म्हणाले की, येथून पुढे उद्योगांत यांत्रिकीकरण खूप वाढणार आहे. परिणामी ते उद्योग रोजगार क्षमता घटवतील. त्यासाठी शेती उद्योगात स्वयंरोजगारासह इतरांना मोठा रोजगार देण्याची क्षमता आहे. औरंगाबादला गुलाब चांगला वाढू शकतो असे हवामान सांगते. सर्वत्र गुलाब रोज मोठ्या प्रमाणावर लागतो तो उद्योग औरंगाबादला नवी ओळख देऊ शकतो. लागवडीपासून पॅकिंगपर्यंत मोठी कामगारांची फळी लागेल. त्यामुळे मोठा रोजगार वाढू शकतो. यापुढे पॉलिमर उद्योगाला चांगले दिवस येत आहेत. आपल्या देशात वर्षाला मिलियन टन पीव्हीसी तयार होते. प्रदूषणाचा प्रश्न येत नाही झिरो डिस्चार्ज करणारा उद्योग आहे.
बातम्या आणखी आहेत...