आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेतील महिला बँक एप्रिलमध्ये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राष्ट्रीयीकृत महिला बँकेची औरंगाबादेतील शाखा जानेवारीऐवजी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या हस्ते जानेवारीत शाखेचे उद्घाटन होणार असल्याचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले होते. गारखेडा येथील रिलायन्स मॉलमधील जागाही निश्चित झाली होती. या संदर्भात खैरे यांनी दिल्लीत मंळवारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी उषा सुब्रमण्यम यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी फेब्रुवारी 2014 मध्ये शाखा स्थापनेची प्रक्रिया होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर एप्रिलमध्ये बँकेचे उद्घाटन केले जाणार आहे.