आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुले चार तास घरासमोर बसून आईची वाट पाहात होते, अन् \'ती\' दारामागे गतप्राण झालेली होती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दुकानावरून चॉकलेट आणेपर्यंत घराला कुलूप होते. आई तर घरातच होती, ती गेली तरी कुठे? या चिंतेत दोघे भावंडे तब्बल चार तास घरासमोर बसून तिची वाट पाहत होती. पण आई कधीच घरी परतणार नव्हती हे त्या भावंडांना कळणार तरी कसे! ज्या कुलूप लावलेल्या दारासमोर ही भावंडे बसली होती त्याच दारामागे (घरात) त्यांची आई गतप्राण झालेली होती. तिचा गळा तोंड दाबून खून झाला होता. पतीनेही तिची आठ तास प्रतीक्षा केली.
हडको एन-१३ मधील वानखेडेनगर येथील ही घटना. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास रोहिणी शिवाजी सोनवणे (३५) या महिलेचा खून करण्यात आला. अनैतिक संबंधांतून दिराने तिचा खून केल्याचा पोलिसांना संशय असून घटनेनंतर तो पसार झाला आहे. रोहिणीला दोन मुले असून मोठा मुलगा जयेश ११ वर्षांचा तर कार्तिक हा दोन वर्षांचा आहे. हे दोघे मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास घरासमोर खेळत होते. त्यांचा काका रामेश्वर सोनवणे हा घरी आला आणि त्याने दोन्ही मुलांना चॉकलेटसाठी पैसे देऊन त्यांना घरापासून लांब पाठवले. मुले घरी परतल्यानंतर घराला कुलूप होते. कोणीतरी दार उघडेल या प्रतीक्षेत ही दोन्ही मुले रात्री दहा वाजेपर्यंत घरासमोर बसून होती. त्यानंतर जवळच असलेल्या आजोबांकडे ती झोपण्यासाठी निघून गेली. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हा प्रकार अनैतिक संबंधांतून घडला असावा, या दिशेने पोलिस तपास करीत आहेत. नातेवाइकांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी दिली. पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले असून दीर रामेश्वर सोनवणे फरार आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, पतीही झोपला व्हरंड्यात तर मुलांना काकांवर संशय
फोटो : मनोज पराती.