आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Z. P. Deputy President Driver And Police Dispute Issue

जि. प. उपाध्यक्षांच्या चालकाची अरेरावी; पोलिसांना केली शिवीगाळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पालकमंत्र्यांनी दुष्काळावर बोलावलेल्या बैठकीला जाताना जिल्हा परिषद उपाध्यक्षा विजया चिकटगावकर यांच्या वाहनाचा चालक कृष्णा चव्हाण याने जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसाशी अरेरावी करण्याचा प्रकार घडला. कार बाजूला घेण्यास सांगितले असता कृष्णाने पोलिसांना शिवीगाळ केली.

शनिवारी (20 जानेवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. या वेळी खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्यांची उपस्थिती होती. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास चिकटगावकर यांची अँम्बेसेडर कार ( एमएच 20 एएस 2425 ) सुरक्षेच्या दृष्टीने मुख्य द्वारासमोर अडवण्यात आली. तेव्हा चालकाने कार हटवण्यास नकार दिला व पोलिसांना शिवीगाळ केली. सरकारी कामात अडथळा केला म्हणून पोलिस कॉन्स्टेबल चंद्रकांत पोटे यांच्या तक्रारीवरून सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.