आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद झालर क्षेत्राकरिता विकास शुल्क भरून परवानगी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद: औरंगाबाद झालर क्षेत्रातील बांधकाम व रेखांकनास परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्जदाराने 550 रुपये चौरस मीटर प्रमाणे भरणा केल्यास परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती सिडकोचे मुख्य प्रशासक डी. डी. तडवी यांनी दिली.
सिडको प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले की, 23 डिसेंबर 2011 रोजी सिडकोच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत औरंगाबाद झालर क्षेत्राकरिता सेवा-सुविधा विकास शुल्क 550 रुपये प्रती चौरस मीटर प्रस्तावास मान्यता देण्यात आली. झालर क्षेत्रातील बांधकाम/रेखांकन परवानगीबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे, परवानगीसाठी अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. त्या विकासकानी यापूर्वी परवानगीसाठी प्रस्ताव दाखल केलेले आहेत, त्यांनी सिडको कार्यालयातील नियोजन विभागात सेवा-सुविधा शुल्काचा भरणा करावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे.