आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: झालरचा प्रारूप आराखडा आज प्रसिद्ध होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नगररचना विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेला 28 गावांचा झालरक्षेत्र प्रारूप आराखडा मंगळवारी (2 जुलै) प्रसिद्ध करण्यात येत आहे. यासाठी आक्षेप आणि दावे सादर करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे.

झालरक्षेत्रासाठी महाराष्ट्र शासनाने सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. सिडकोच्या वतीने तयार केलेला आराखडा वादाच्या भोवर्‍यात सापडल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नव्याने नकाशा बनवण्याची जबाबदारी नगररचना विभागास सोपवली होती. नगररचनाचे उपसंचालक एच. जे. नाझिरकर यांनी आराखडा तयार करण्यासाठी डिसेंबर 2011 मध्ये प्रारंभ केला होता. मार्च 2013 मध्ये काम पूर्ण करून सिडकोकडे सुपूर्द केला. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया औरंगाबाद दौर्‍यावर आले असता नाझिरकरांनी प्रारूप आराखड्याची माहिती दिली. या निर्णयाचे औरंगाबाद झालरक्षेत्र विकास समितीने स्वागत केले आहे.