आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा निकाल तूर्त जाहीर करू नका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सोमवारी (2 सप्टेंबर) होणार्‍या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी व न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी मनाई केली आहे.

विभागीय जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने नाहिदाबानो पठाण यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. या निर्णयास आव्हान देणारी याचिका खंडपीठात दाखल झाली आहे. जानेवारी 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत पठाण या इतर मागास प्रवर्गातून सातारा जि.प. गटातून काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाल्या. त्यानंतर त्यांची जि.प. अध्यक्षपदी निवड झाली. त्यांच्या मोमीन जातीच्या वैधता प्रमाणपत्रास शिवसेनेच्या पराभूत उमेदवार अनिता चोपडे यांनी अँड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत आव्हान दिले. खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे व न्यायमूर्ती सुनील देशमुख यांनी पठाण यांचा मोमीन जातीचा दावा 7 जानेवारी 2013 रोजी रद्द ठरवून प्रमाणपत्र फेरपडताळणीसाठी समितीकडे पाठवले होते. या निर्णयास पठाण यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊन खंडपीठाचे आदेश स्थगित करण्याची विनंती केली होती.

दरम्यान, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवार शारदा जारवाल इच्छुक आहेत. त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रास पराभूत उमेदवार सुनीता रामसिंग चव्हाण यांनी खंडपीठात अँड. पी. एस. पवार यांच्यामार्फत आव्हान दिले आहे. प्रकरणाची सुनावणी 2 सप्टेंबर रोजी होणार आहे.